पुणे- Kapil Dev : गेल्या काही वर्षात देशाच्या राजकारणात खेळाडूंही सक्रिय होत असल्याच पाहायला मिळत आहे. याच खेळाडूंच्या राजकीय प्रवेशावर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, "जर राजकारणी व्यक्ती खेळांच्या व्यवस्थेत लक्ष घालत असतील तर खेळाडूंनीही राजकारणात का जाऊ नये", असा मार्मिक टोलाही राजकारण्यांना कपिल देव यांनी लगावला आहे.
"राजकारणी जर खेळात सहभागी होऊ शकत असतील तर खेळाडूंमीही राजकारात गेल्यास त्यात काय वाईट आहे. चांगले लोक राजकारणात चागले विचार घेऊन आले पाहिजेत. आपण प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे. त्यादिवशी सुट्टीच्या नावाखाली कोणी जर मतदानाला जाणार नसेल तर त्याच्यावर टीकाही झाली पाहिजे," असं कपिल देव यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
मणिपाल हॉस्पिटल, खराडी येथे पद्मभूषण कपिल देव यांच्या हस्ते उन्नत ऑर्थोपेडिक सर्जरीसाठी अत्याधुनिक रोबोटिक टेक्नॉलॉजी लॉन्च करण्यात आली. यावेळी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव बोलत होते.
यावेळी कपिल देव म्हणाले की, "चांगल्या राजकारण्याने हा देश चालवावा असं प्रत्येक नागरिकांना वाटत असेल तर मतदानाच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी होऊन मोठया संख्येनं मतदान करणे गरजेचे आहे. तसेच जे मतदान करणार नाही त्यांना कोणतीही टीका करण्याचा अधिकार नाही", असे परखड मत यावेळी कपिल देव यांनी मांडलं.