महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. ज्योती मेटेंनी घेतली शरद पवारांची भेट, बीडमधून उमेदवारी देण्याबाबत चर्चा - Lok Sabha election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Jyoti Mete Meet Sharad Pawar : दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेतलीय.

Jyoti Mete Meet Sharad Pawar
Jyoti Mete Meet Sharad Pawar

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 5:29 PM IST

डॉ. ज्योती मेटेंची प्रतिक्रिया

मुंबईJyoti Mete Meet Sharad Pawar :लोकसभा निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. महाविकास आघाडीमध्ये काही जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीनं पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर महाविकास आघाडीनं अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही.

चर्चा अंतिम टप्प्यात : ज्योती मेटे यांनी आज शरद पवार यांची मुंबईतील त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर ज्योती मेटे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 'सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर राजकारणात सक्रिय होण्याचं ठरवून मी राजकारणात प्रवेश केलाय. मी राजकारणात सक्रिय झाल्यापासून आज शरद पवार यांची दुसऱ्यांदा भेट घेतलीय. त्यामुळं मी आता शरद पवार यांच्या निर्णयाची वाट पाहात आहे. आजची बैठक राजकारणात प्रवेश करण्याबाबतच होती', असं देखील ज्योती मोटे यांनी म्हटलंय.

बीडमधून उमेदवारी देण्याबाबत चर्चा :बीडमधून उमेदवारी देण्याबाबत चर्चा अजूनही शरद पवार यांच्यासोबत सुरू असून आम्ही पक्षाची भूमिका शरद पवार यांच्यासमोर मांडली आहे. त्यामुळं शरद पवारांच्या निर्णयाचीही प्रतीक्षा आहे. तसंच, आज आपण महाविकास आघाडीशी संबंधित नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच शरद पवार यांची भेट घेऊन राजकीय सौदेबाजी करण्याचा आमचा अजिबात प्रयत्न नाही. आम्ही कोणत्याही प्रकारचं दबाव तंत्र वापरत नाही. राजकारण सक्रिय झाल्यानंतर भविष्यातील व्यूहरचनात्मक दिशेची चर्चा होणे स्वाभाविक आहे. शरद पवार यांची दुसऱ्यांदा भेट झाली असून, चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं ज्योती मेटे यांनी सांगितलं.

ज्योती मेटे राजकारणात सक्रिय : शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून दिवंगत नेते विनायक मेटे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात चांगलं काम केलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बीडसह राज्यात त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. विनायक मेटे यांच्या निधनानंतर सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन ज्योती मेटे राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. बीड लोकसभा मतदारसंघातून 'त्या' महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. महाविकास आघाडीनं त्यांना उमेदवारी न दिल्यास त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलंत का :

  1. उबाठा गटाकडून लोकसभेच्या चार जागा जाहीर; उन्मेश पाटलांनी हाती बांधलं 'शिवबंधन' - Lok Sabha Election 2024
  2. उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश, भाजपावर टीका करताना म्हणाले,... - Unmesh Patil news
  3. शिंदे गटाचे स्टार प्रचारक अडचणीत, प्राथमिक सदस्यत्व सिद्ध करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश - LOK SABHA ELECTION 2024

ABOUT THE AUTHOR

...view details