मुंबईJournalists issues : विधानमंडळात जाहीर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री शंभुराज देसाई, संजय बनसोडे हे विधानभवनातील पत्रकार कक्षात आले. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ पत्रकारांसाठी असलेल्या बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेसह पत्रकारांच्या प्रलंबित मागण्यांकडं लक्ष वेधलं. गेली अनेक वर्ष पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागली नसल्यानं यावेळी पत्रकार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
पत्रकारांना न्याय मिळत नाही : अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सभागृहात मांडल्यानंतर याची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री विधानभवनातील पत्रकार कक्षात आले. राज्यातील सर्वच घटकांना न्याय देणारा अंतरिम अर्थसंकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री म्हणाले. यावेळी विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि कार्यवाह प्रवीण पुरो तातडीनं समोर येत म्हणाले की, "आपलं सरकार सर्व घटकांना न्याय देणारं सरकार म्हणून ओळखलं जातं. मात्र, या सरकारमध्ये पत्रकारांनाच न्याय मिळत नाही", असं ते म्हणाले.
पत्रकारांच्या समस्येचा पत्रकार संघाकडून वारंवार पाठपुरावा करुनही सरकारकडून फक्त आश्वासन दिलं जातंय. सरकारनं लवकरात लवकर पत्रकारांच्या मागण्या मान्य कराव्यात. - प्रमोद डोईफोडे, अध्यक्ष, विधिमंडळ वार्ताहर संघा