ETV Bharat / state

मेळघाटातील मृत वाघाचे तीन पंजे नेले कापून; मृत्यूचं कारण अस्पष्ट - TIGER DEATH IN AMRAVATI DISTRICT

मेळघाटात वाघाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी उघडकीस आली होती. या मृत वाघाचे तीन पंजे कापून नेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

DEAD TIGER AT MELGHAT
मेळघाटात वाघाचा मृत्यू (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2024, 10:15 PM IST

अमरावती : मेळघाटात अंजनगाव वनपरिक्षेत्रातील परिसरात मंगळवारी (26 नोव्हेंबर) सायंकाळी एका वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आढळून आलेल्या मृत वाघाचे तीन पंजे कापून नेले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे वाघाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

अशी आहे घटना : मंगळवारी सायंकाळी पांढरा खडक वर्तुळ अंतर्गत वनकर्मचारी गस्तीवर असताना 1032 वस्तापूर नियत क्षेत्रांतर्गत नर वाघ मृतावस्थेत आढळून आला. गस्तीवर असणाऱ्या पथकानं याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर अंजनगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. बावनेर, परतवाडा येथील सहाय्यक वनसंरक्षक सुहास चव्हाण तसंच मेळघाट प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक अग्रिम सैनी हे सायंकाळी घटनास्थळी पोहोचले. मात्र, सूर्यास्त झाल्यामुळं अंधार पडला. यामुळं पुढील कारवाईसाठी वाघ ज्या ठिकाणी मृतावस्थेत होता, त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना पाळत ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांनी दिले.

शवविच्छेदन पथक गठीत : "बुधवारी (27 नोव्हेंबर) सकाळी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शनात शवविच्छेदन पथक गठीत करण्यात आलं. यामध्ये मानद वन्यजीव रक्षक प्रा. डॉ. सावंन देशमुख, स्टॅंडिंग फॉर टायगर फाउंडेशनचे अल्केश ठाकरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रशेखर धनगर, पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.आर. टाले यांचा शवविच्छेदन पथकात समावेश आहे. यांच्यासह उपवनसंरक्षक अग्रीम सैनी, सहाय्यक वनसंरक्षक सुहास चव्हाण अंजनगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.पी. बावनेर यांच्या उपस्थितीत वाघाचं शवविच्छेदन करण्यात आलं. वाघाच्या शरीराचे काही नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वाघाचा मृत्यू नेमका कशामुळं झाला हे स्पष्ट होईल," असं मेळघाट प्रादेशिक वनविभागाचे उपवनसंरक्षक अग्रीम सैनी यांनी सांगितलं.

घातपाताची शक्यता : "वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. असं असलं तरी मृत वाघाचे तीन पंजे कुऱ्हाडीनं कापून नेण्यात आल्याचं समोर आलं असून एका पंजाला केवळ दोन नखं आढळून आलीत. वाघाचे पंजे कापून नेणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली. या प्रकरणात मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत क्राईम सेल आणि पोलिसांच्या समन्वयानं तपास केला जाईल," असं देखील उपवनसंरक्षक अग्रीम सैनी यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा

  1. सावधान! सायबर गुन्हेगारांनी 75 वर्षीय वृद्धाला घातला तब्बल 11 कोटी रुपयांचा गंडा
  2. सावधान! राज्यात इन्फ्ल्युएंझा विषाणूचा प्रादुर्भाव, मागील 11 महिन्यांत 57 जणांचा मृत्यू, तर 2,325 जणांना लागण
  3. फी भरण्यासाठी भावी इंजिनियरनं फोडलं मोबाईलचं दुकान; 54 मोबाईल लंपास, परिस्थितीनं हतबल केल्याची कबुली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.