पर्थ Australian Cricketer Death Amid BGT : सध्या भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. याच दरम्यान, क्रिकेट जगताला धक्का देणारी एक दु:खद बातमी समोर आली आहे. 23 वर्षीय ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू आदि दवेचं अचानक निधन झालं आहे.
पहिल्या सामन्यात भारताचा विजय : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये झाला होता, या सामन्यात भारतीय संघानं 295 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून ॲडलेड इथं खेळवला जाणार आहे. दरम्यान, ही दुःखद बातमी समोर आली आहे.
डार्विन क्रिकेट क्लबनं दिली मृत्यूची माहिती : क्रिकेटरच्या मृत्यूचा खुलासा डार्विन क्रिकेट क्लबनं केला आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. आदि दवे यांच्या मृत्यूमागचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. दवे हा एक उत्तम अष्टपैलू खेळाडू होता. त्यानं आपल्या डाव्या हाताच्या फिरकी गोलंदाजीनं चांगल्या फलंदाजांना पायचीत केलं आहे. दवे वयाच्या 15 व्या वर्षी पहिल्यांदा प्रसिद्धीझोतात आला. 2017 मध्ये, या खेळाडूनं इंट्रा संघात डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथसोबत सामना खेळला होता. यादरम्यान त्याला क्षेत्ररक्षणाची संधी मिळाली.
10 वर्षांपूर्वी दिग्गज क्रिकेटपटूचं झालं होतं निधन : 10 वर्षांपूर्वी 27 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं आपला सर्वोत्तम खेळाडू गमावला होता. 27 नोव्हेंबर 2014 रोजी स्टार क्रिकेटर फिल ह्यूजचं निधन झालं होतं. फलंदाजी करताना फिल ह्युजच्या डोक्याला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज शॉन ॲबॉटच्या चेंडूनं ह्यूजच्या डोक्याला मार लागला. यानंतर तो कोमात गेला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते पण अखेर त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा :