ETV Bharat / state

लिव्ह इन पार्टनरची हत्या करून दिली हरविल्याची तक्रार, पोलिसांनी गुन्ह्याचा 'असा' लावला छडा

सातारा पोलिसांनी खंबाटकी घाटातील दरीत मृतदेह आढळून आलेल्या महिलेची ओळख पटविली. अवघ्या काही तासात गुन्ह्याचा छडा लावला.

live in partner murder case
लिव्ह इन पार्टनरची हत्या (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

सातारा - खंबाटकी घाटातील दरीत मृतदेह आढळून आलेल्या महिलेची लिव्ह इन पार्टनरनं हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली. लिव्ह इन रिलेशन संपुष्टात आणण्याच्या प्रयत्नात असल्यानं संशयितानं प्रेयसीच्या डोक्यात हातोड्याचे घाव घालून हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. जयश्री विनय मोरे (रा. राजमुद्रा पेट्रोल पंपाशेजारी, मारूंजी, ता. मुळशी) असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे.

ट्रक चालकानं पाहिला मृतदेह- खंबाटकी घाटात बंद पडलेला मालट्रकच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकला बोलावून चालक दरीकडेला उभा असताना त्याला दरीत एका महिलेचा मृतदेह दिसला. त्याने खंडाळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शिरवळ रेस्क्यू टीमच्या मदतीनं मृतदेह दरीतून वर काढला. मृत महिलेचं वय अदाजे २७ वर्ष होतं. तसेच डोक्यात लोखंडी वस्तुनं पाच-सहा घाव घालण्यात आल्याचं आढळून आले. हा घातपाताचा प्रकार असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीनं धागेदोरे मिळवायला सुरूवात केली.

बेपत्ता नोंदीवरून घटनेचा झाला उलगडा - पोलिसांनी हरविलेल्या व्यक्तींची माहिती घेतली असता पिंपरी चिंचवडमधील वाकड हद्दीतून एक महिला बेपत्ता असल्याचं समजलं. त्या बेपत्ता महिलेले वर्णन मृत महिलेशी जुळले. मृत महिला ही संशयित आरोपी दिनेश पोपट ठोंबरे याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. संशयितानंच पोलीस ठाण्यात ती हरविल्याची तक्रार दिली होती. खंबाटकी घाटात मृतदेह आढळल्यानंतर फलटणचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासात मृत महिलेची माहिती मिळवली.

कारमध्येच केली हत्या - जयश्री मोरे ही चार वर्षांपासून संशयित दिनेश ठोंबरे याच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. त्याला सोडून ती आई-वडीलांसोबत राहायला जाणार होती. त्यामुळे संशयित आरोपी संतापलेला होता. २४ नोव्हेंबर रोजी रात्री त्यानं तिला बोलावून घेतलं. कारमधून तिला बाहेर घेऊन गेला. कारमध्येच त्यानं हातोड्याचे घाव घालून तिची हत्या केली. कारमध्ये मृतदेह घेऊन खंबाटाकी घाटात आला. मृतदेह दरीत टाकून मध्यरात्री पुण्याला गेला. धक्कादायक बाब म्हणजे मृतदेह खंबाटकी घाटात आणून टाकल्यानंर दोन दिवसांनी संशयितानंच महिला हरविल्याची तक्रार दिली होती.

  • मुलाला बेवारस स्थितीत दिलं सोडून- मृत महिलेच्या ३ वर्षाच्या मुलाला संशयितानं आळंदीत बेवारस स्थितीत सोडून दिलं. सुदैवाने पोलिसांनी त्याच्या आजोबांचा पत्ता शोधून काढला. त्यांच्याशी संपर्क साधून बोलावून घेतलं. पोलिसांनी मुलाला आजोबांच्या ताब्यात दिलं.

हेही वाचा-

  1. झाडाझुडपात सापडला अल्पवयीन मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.