मुंबई Indian Navy : इराणी मासेमारी बोट हायजॅक करून मासेमारीची बोट आणि त्यावरील 23 क्रू मेंबर्स यांना सोमालियन चाचे यांनी ओलीस ठेवलं होतं. याप्रकरणी यलो गेट पोलिसांनी (Yellow Gate Police) नऊ सोमालियन चाच्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 364 अ, 363, 353, 341, 342, 344, 120, 143, 145, 148, 149, 506 (2), 34 सह मेरीटाईम अँटी पायरसी ऍक्ट कलम 3 आणि 5 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, 27 त्याचप्रमाणे पासपोर्ट अधिनियम कलम 3 आणि 6, परकीय नागरिक कायदा कलम 14 अन्वये गुन्हा दाखल केल्याची, माहिती पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिलीय.
अटक आरोपींची नावे : अटक केलेल्या आरोपींची नावे जेली जामा फराह (वय 50), अहमद बाशीर ओमर (वय 42), अबदीकरीन मोहम्मद शिरे (वय 34), अदन हसन वारमसे (वय 44), मोहम्मद अब्दी अहमद (वय 34), अबदीकादिर मोहम्मद अली (वय 28), अयोदीद मोहम्मद जिमाले (वय 30), सईद यासीन अदान (वय 25) आणि जमा सईद एल्मी (वय 18) अशी आहेत.
जहाज केले हायजॅक : बुधवारी भारतीय नौदलाचे आयएनएस त्रिशूल या युद्धनौकेचे रेग्युलेटिंग ऑफिसर लेफ्टनंट अजित कुमार अवाल यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, भारतीय नौदलाकडून समुद्रातून जाणारी व्यापारी जहाज आणि क्रू मेंबर्स यांची सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर नियमित घालण्यात येणाऱ्या गस्ती दरम्यान, 28 मार्च रोजी रात्री अकराच्या सुमारास आयएनएस त्रिशूल आणि नेवल शिप सुभेधा यांना इरानियन झेंडा असलेले एक जहाज ज्याचे नाव एआय कंबर या मासेमारी करणाऱ्या जहाजास हायजॅक केल्याचा हायअलर्ट मिळाला होता. आय एन एस त्रिशूल आणि नेवल शिप सुभेदा यांना पक्की खात्री झाली की, मासेमारी करणारे जहाज हे समुद्री चाच्यांनी हायजॅक केले आहे.
काय आहे प्रकरण: आयएनएस त्रिशूल आणि नेवलशिप सुभेदा या इंडियन युद्ध नौका 29 मार्च मध्यरात्री तीन वाजून दहा मिनिटांनी खात्री केली की, सदरचे ठिकाण हे 105 नोटीकल मेल सोमालियाच्या कोस्ट हद्दीत आहे. भारतीय युद्धनौकेवरील अधिकारी यांनी त्यांना वारंवार अनाउन्समेंट करून सांगितलं की, तुम्ही जहाज थांबवा आणि पोलीस ठेवलेल्या इसमांना मुक्त करा अन्यथा आम्हाला तुमच्याविरुद्ध कारवाई करावी लागेल. परंतु सागरी चाच्यांनी काहीही ऐकून न घेता जहाज थांबवत नव्हते नव्हते. म्हणून आयएनएस सुमेधा ही युद्धनौका जवळ जाऊन १६ नंबर चैनल मेरी टाईम मोबाईल ब्रॉडकास्ट मार्फत त्यांना वॉर्निंग करत होते. परंतु, सागरी चाचे त्याकडं दुर्लक्ष करत होते. त्यानंतर वारंवार दिलेल्या वार्निंगनंतर सोमालियन चाच्यांनी ओलीस ठेवलेल्या कृ मेंबर्सना ढाल बनवून मासेमारीच्या डेकवर येऊन सरेंडर करत आहे, असा संदेश दिला. त्यानंतर त्यानं त्यांच्याकडं असलेले बेकायदेशीर पिस्तूल पाण्यात टाकून नष्ट केले. त्यानंतर भारतीय युद्ध नौकेवरील कमांडो हे ओलीस ठेवलेल्या मासेमारी जहाजावर उतरले आणि खात्री केली असता त्यामध्ये एकूण नऊ सोमालियन चाचे होते. तसेच ओलीच ठेवलेल्या मासेमारी जहाजावरील एकूण 23 क्रू मेंबर्स हे पाकिस्तानी नागरिक होते. त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली.
नऊ सोमालियन चाच्यांना अटक :भारतीय युद्धनौकेवरील कमांडो यांनी कृ मेंबर्सकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितलं की, सोमालियन चाच्यांकडं एके 47 रायफल, हॅन्ड ग्रॅनाईट आणि रॉकेट लॉन्चर होते आणि ते जबरदस्तीने त्यांच्या मासेमारी जहाजावर चढले आणि त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून जर काही हालचाल केल्यास मारून टाकू अशी धमकी दिली होती. त्यावेळी भारतीय कमांडो यांनी मासेमारी जहाजाची पाहणी केली असता त्या जहाजावर एकूण 728 जिवंत काढतुसे, एके 47 रायफलची तसेच एक जीपीएस डिवाइस, आठ मोबाईल फोन इत्यादी साहित्य जप्त करून ताब्यात घेतले. सोमालियन चाच्यांनी ताब्यात घेतलेली इरानियन देशाचा झेंडा असलेली मासेमारी बोट आणि त्यावरील 23 क्रू मेंबर्स यांच्याकडं चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आलं आहे. त्याचप्रमाणं एकूण नऊ सोमालियन चाच्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई यलो गेट पोलिसांकडून करण्यात येत असल्याची माहिती, पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिलीय.
हेही वाचा -
- मच्छीमार नौकेत कुजक्या माशांच्यामुळे तयार झाला गॅस, दोघांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक
- Boat drowned in Sea: मुंबईच्या समुद्रात बोट उलटली; 2 मच्छीमार बुडाल्याची भीती, शोध मोहीम सुरू
- Fisherman Missing: समुद्रातून 5 खलाशांसह मासेमारी नौका बेपत्ता