महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खंडणी वसूल करणाऱ्या इम्रान कालियाचं निघालं दाऊद इब्राहिम कनेक्शन, 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी - Mumbai Crime Branch

Mumbai Crime News कुख्यात गुंड दाऊत इब्राहिमच्या नावाने धमकावत खंडणी मागणाऱ्या गँगस्टर इम्रान कालिया दाऊदचा भाऊ मुस्तकीम इब्राहिम कासकरच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाचा सविस्तर

Imran Kalia
इम्रान कालियाला (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 1:18 PM IST

मुंबई Mumbai Crime News: गँगस्टर इम्रान कालियाच्या अटकेनंतर तो दाऊदचा भाऊ मुस्तकीम इब्राहिम कासकरच्या संपर्कात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी कासकरचा मोबाइलवरून त्याचा आंतरराष्ट्रीय क्रमांकही जप्त केला आहे. मीरा रोडच्या महिलेकडून पैसे उकळल्याप्रकरणी कालियाला अटक करण्यात आली होती. शनिवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर पुन्हा एकदा कालियाला न्यायालयात हजर केले असता त्याला १२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


खंडणी विरोधी पथकाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "कालियाच्या फोनमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय क्रमांकही सापडले आहेत. त्याबाबात गुन्हे शाखा तपास करत आहे." पोलिसांनी त्यांच्या रिमांडमध्ये म्हटले आहे की, "आरोपी इम्रान कालियानं दाऊद इब्राहिमसोबत त्याच्या वडिलांचा फोटो खंडणीसाठी वापरला होता. आरोपीने आणखी किती लोकांना धमकावले हे शोधण्यासाठी तपास केला जाणार आहे."


१० लाख रुपये जप्त: पोलिसांनी इम्रान कालियाकडून 46 लाख रुपयांपैकी 10 लाख रुपये जप्त केले आहेत. आणखी काही रक्कम जप्त करायची आहे. मीरा रोड येथील रहिवासी असलेली ४६ वर्षीय महिला दुबईमध्ये मार्केटिंग कर्मचारी म्हणून काम करत असताना इम्राननं तिला चांगल्या नफ्याचं आश्वासन दिलं. सोन्याच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. महिलेने मीरा रोड येथील घराच्या विक्रीतून 46 लाख रुपये गुंतवले. मात्र इम्रान कालियानं नफ्याची रक्कम दिली नाही.

इब्राहिमचा नातेवाईक सांगून उकळले १६ लाख:इम्रान कालियानं दाऊदच्या नावाने महिलेला धमकावले. स्वत:ला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी आणि नातेवाईक असल्याचे सांगून 16 लाख रुपये उकळले. दुबईत राहणाऱ्या मुलांनाही जीवे मारण्याची धमकी इम्रानने दिली. महिलेच्या तक्रारीवरून चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच खंडणीविरोधी पथकाने इम्रान कालियाला नागपाडा येथून अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे.

हेही वाचा

  1. दाऊद टोळीचा हस्तक इम्रान कालियाला खंडणी प्रकरणी अटक, महिलेला धमकावून उकळले होते 46 लाख रुपये - Crime News
  2. दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाला तर मुंबईसह आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगतावर काय परिणाम होईल?

ABOUT THE AUTHOR

...view details