महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईकरांची सकाळ आज गारेगार...तर, पुढील चार दिवसासाठी विदर्भसह मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट - Maharashtra MONSOON UPDATE

Monsoon update आज सकाळपासून मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासांत मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट जारी केला आहे. तसच संपूर्ण आठवडाभर वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

Mumbai Pune Thane Palghar Yellow Alert
मुंबई-पुणे यलो अलर्ट (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 19, 2024, 12:19 PM IST

मुंबई Monsoon update:गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात विश्रांती घेतलेल्या पावसानं आज बुधवार (19 जून) सकाळपासून पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. पावसानं विश्रांती घेतल्यानमुळे मुंबईत पुन्हा एकदा उकाडा वाढला होता. परंतु आज पहाटेपासूनच सुरू झालेल्या पावसानं मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. या संदर्भात भारतीय हवामान विभागाच्या मुंबई डिव्हिजनने हवामानाचा अंदाज वर्तवला. मुंबईसह राज्यात 20 जून पासून पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याच म्हटलं आहे. अरबी समुद्रातून मान्सूनचे मोसमी वारे वाहत असल्यानं मुसळधार पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

20 जूननंतर पडणाऱ्या पावसाने दुष्काळानं होरपळणाऱ्या बळीराजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सक्रिय पावसासाठी मोसमी वाऱ्यांना योग्य गती मिळणे गरजेचे असते. मात्र, मागील काही दिवसात मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावल्यानं मुंबईसह राज्यात पाऊस लांबणीवर गेल्याचं हवामान विभागानं सांगितल आहे.


मुंबई-पुणे यलो अलर्ट: हवामान विभागानं पुढील 48 तासांत मुंबई सह ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून यलो अलर्ट जारी केला आहे. तसचं हवामान विभागाच्या मुंबई विभागानं मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आज मुसळधार आणि त्यानंतर शनिवारपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे.


रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा:हवामान तर्फे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात वादळ आणि पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत समाधानकारक पाऊस नाही: मुंबईत साधारण 11 जून पर्यंत मान्सूनचं आगमन होतं असं मानलं जातं. मात्र, यंदा मान्सून 9 जून रोजी मुंबईत दाखल झाला. त्यानंतर आठवडाभर दांडी मारली. पावसाचा जून महिन्याचा आढावा बघता मुंबईत समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेल्या आठवडाभरापासून मुंबईच्या वातावरणात सतत बदल होताना दिसत आहेत. विशेषत: सकाळ आणि संध्याकाळ पावसाचे ढग दाटून आलेले असतात. मुंबईकरांच्या नजरा सध्या पावसाकडेच खिळल्या आहेत.

जूनमध्ये सरासरी 500 मिमी पाऊस होणे अपेक्षित: मिळालेल्या माहितीनुसार, जूनमध्ये सरासरी 500 मिमी पाऊस होणे अपेक्षित आहे. मागील काही दिवसांत मुंबई शहरात 198 मिमी तर उपनगरात 128 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 12 जूनपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये 5.5 टक्के पाणी शिल्लक आहे. तर गेल्या वर्षी हे प्रमाण 9.7 टक्के होते. त्यामुळे मुंबईत किंवा गाठोडा भरतोय समाधानकारक पाऊस होणे, अत्यंत गरजेच असल्याचं बोललं जात आहे. आज बुधवार मुंबईचे किमान तापमान 25 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, संपूर्ण आठवडाभर हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण आठवडाभर वातावरण ढगाळ राहील, असा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा

  1. मराठवाडासह कोकण विभागाला हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'; पेरणीच्या कामांसाठी बळीराजाला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा - Maharashtra Weather Forecast
  2. रिमझिम पावसानं 'मिनी काश्मीर'चं सौंदर्य खुललं, महाबळेश्वरात पावसाळी पर्यटन हंगाम सुरू - Maharashtra Hill Stations

ABOUT THE AUTHOR

...view details