महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पूजा खेडकर यांचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन; 'YCM' रुग्णालयातूनसुद्धा मिळवलं अपंगत्वाचे प्रमाणपत्र - IAS Pooja Khedkar - IAS POOJA KHEDKAR

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या अडचणीतील वाढ काही कमी होताना दिसत नाही. खेडकर यांच्या प्रमाणपत्राबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून (YCM Hospital Pune) देखील 2022 मध्ये अपंगत्वाचेे प्रमाणपत्र घेतल्याचं उघडकीस आलं आहे.

IAS Pooja Khedkar News
पूजा खेडकर प्रकरण (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 10:46 PM IST

पुणे IAS Pooja Khedkar :वादग्रस्त आयएएस पूजा खेडकर या विविध कारणांनी चर्चेत आहेत. आता पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचं पिंपरी-चिंचवड कनेक्शन समोर आलं आहे. वायसीएम रुग्णालयातूनही (YCM Hospital Pune) त्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतले होते.

प्रतिक्रिया देताना मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र वाबळे (ETV BHARAT Reporter)


गुडघ्याच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र : पूजा खेडकर यांचं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातूनही अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलंय. डाव्या गुडघा सात टक्केवारी कायमस्वरूपी आधु असल्याचं या प्रमानपत्रात नमूद करण्यात आलं आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी हे प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिलं होतं. याआधी पूजा खेडकर यांना कमी दिसतं, त्याअनुषंगाने त्या चर्चेत होत्या. अशातच आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र समोर आलं आहे.



यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचा काय संबंध : 24 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या या प्रमाणपत्रात त्यांच्या डाव्या गुडघ्याच्या सात टक्के कायमस्वरूपी अपंगत्वाचं उल्लेख आहे. अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रेशन कार्ड आणि इलेक्ट्रिक बिल सादर केलं होतं. याआधी त्या कमी दिसण्याच्या समस्येमुळं चर्चेत होत्या.


पिंपरी-चिंचवड कनेक्शन :पूजा खेडकर यांना 2023 बॅचच्या आयएएस अधिकारी म्हणून पुणे जिल्ह्यातील प्रोबेशन पिरियडमध्ये एडीएम म्हणून नियुक्ती मिळाली होती. प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांनी प्रशासनाच्या कामकाजाच्या बाबतीत शिकण्याची अपेक्षा होती. परंतु त्यांच्यावर आरोप आहेत की, त्यांनी जाईन करण्यापूर्वीच अनुचित मागण्या केल्या आणि त्यानंतर देखील सतत तक्रारी केल्या. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांकडे त्यांच्या तक्रारीची नोंद केली होती. पूजा खेडकर यांच्या विवादास्पद वर्तनामुळं आणि त्यांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रामुळं पिंपरी-चिंचवड कनेक्शन समोर आलं आहे. ज्यामुळं त्यांच्या बाबतीत आणखी नवीन चौकशी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. पूजा खेडकर यांना विचारले अनेक प्रश्न पण उत्तर मा्त्र एकच "माझं जे काही असेल..." - IAS Pooja Khedkar
  2. पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा; दिव्यांगत्वाची दोन प्रमाणपत्र असताना तिसऱ्या प्रमाणपत्रासाठी अर्ज - IAS Pooja Khedkar
  3. पूजा खेडकरच्या फरार कुटुंबाचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू, पंतप्रधान कार्यालयानं सविस्तर मागिवला अहवाल - IAS Pooja Khedkar Family Absconded

ABOUT THE AUTHOR

...view details