चंद्रपूर : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली वाघांची संख्या, त्यांना कमी पडत असलेला अधिवास आणि जंगलात होणारे अतिक्रमण यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला आहे. मागील चार वर्षांत तब्बल 98 वाघ आणि बिबट्यांच्या मृत्यू झाला तर वन्यजीवांच्या हल्ल्यात आतापर्यंत 145 जणांना जीव गमवावा लागला आहे. चंद्रपूर जिल्हा हा जंगलाच्या दृष्टीने चार विभागांत विभागलेला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि मध्य चांदा या चार विभागांत 2021 ते 2024 दरम्यान जिल्ह्यात 98 वाघ-बिबट्याचा मृत्यू झाला असून, यात 59 वाघ तर 39 बिबट्याचा समावेश आहे.
नैसर्गिकरीत्या किंवा अधिवास मिळवण्यासाठी दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू : बऱ्याचदा या हिंस्त्र प्राण्यांचा नैसर्गिकरीत्या किंवा अधिवास मिळवण्यासाठी दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू होतो, तर कधी वन्यजीवांपासून शेतीचे नुकसान टाळण्यासाठी जिवंत विद्युततारांचा प्रवाह सोडला जातो, यातदेखील अशा प्राण्यांचा मृत्यू होतो. 2021 मध्ये एकूण 12 वाघ आणि 13 बिबट्यांचा मृत्यू झाला होता. यामध्ये चंद्रपूर विभागात 4, ब्रह्मपुरी 1, मध्य चांदा 4 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 3 अशा 12 वाघांचा समावेश आहे. तर चंद्रपूर विभागात 6, ब्रह्मपुरी 4, मध्य चांदा 1 आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्प येथे 2 अशा 13 बिबट्यांचा समावेश आहे. 2022 मध्ये ही संख्या कमी झाली. या वर्षात जिल्ह्यात 12 वाघ आणि 7 बिबट्यांचा मृत्यू झाला. यामध्ये चंद्रपूर विभागात 3, ब्रह्मपुरी 2, मध्य चांदा 3 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 4 अशा 12 वाघांचा समावेश आहे. तर चंद्रपूर विभागात 3, ब्रह्मपुरी 3, मध्य चांदा 1 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 0 अशा 7 बिबट्यांचा समावेश आहे.
वन्यजीवांच्या मृत्यूच्या आकडेवारीत मोठी वाढ :2023 मध्ये वन्यजीवांच्या मृत्यूच्या आकडेवारीत मोठी वाढ झालीय. या वर्षात 27 वाघ आणि 14 बिबट्यांचा मृत्यू झालाय. यामध्ये चंद्रपूर विभागात 9, ब्रह्मपुरी 6, मध्य चांदा 10 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 2 अशा 27 वाघांचा समावेश आहे. तर चंद्रपूर विभागात 4, ब्रह्मपुरी 7, मध्य चांदा 2 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 1 अशा 14 बिबट्यांचा समावेश आहे. 2024 मध्ये आतापर्यंत 8 वाघ आणि 5 बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आलंय. यात चंद्रपूर विभागात 4, ब्रह्मपुरी 1, मध्य चांदा 3 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 0 अशा 8 वाघांचा समावेश आहे. तर चंद्रपूर विभागात 2, ब्रह्मपुरी 2, मध्य चांदा 1 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 0 अशा 5 बिबट्यांचा समावेश आहे.
वन्यजीवांच्या हल्ल्यात चार वर्षांत 145 जणांचा मृत्यू :2021 ते 2024 या चार वर्षांत वन्यजीवांच्या हल्ल्यात तब्बल 145 नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय. यात एकट्या वाघाच्या हल्ल्यात 123 नागरिकांचा जीव गेलाय. बिबट्याच्या हल्ल्यात 17, रानडुकरांच्या हल्ल्यात 4 आणि हत्तीच्या हल्ल्यात एका जीवास मुकावे लागले. 2021 मध्ये जिल्ह्यात वन्यजीवांच्या हल्ल्यात 43 जणांचा मृत्यू झाला. यात वाघाच्या हल्ल्यात 34, बिबट्या 6, रानडुक्कर 2 आणि एका जणाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर विभागात 8, ब्रह्मपुरी 13, मध्य चांदा 4 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 9 अशा 34 नागरिकांचा समावेश आहे. तर बिबट्याच्या हल्ल्यात एकट्या चंद्रपूर विभागात 6 जणांचा मृत्यू झालाय.
तर 7 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू :2022 मध्ये एकूण 51 जणांचा मृत्यू झाला. यात 44 जणांचा वाघाच्या हल्ल्यात तर 7 जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यात वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर विभागात 12, ब्रह्मपुरी 23, मध्य चांदा 0 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 9 अशा 44 जणांचा समावेश आहे. तर बिबट्याच्या हल्ल्यात चंद्रपूर विभागात 4, ब्रह्मपुरी 1, मध्य चांदा 3 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 0 अशा 7 नागरिकांचा समावेश आहे. 2023 मध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यात 25 जणांचा मृत्यू झालाय. यात वाघाच्या हल्ल्यात 21, बिबट्या 3 आणि रानडुकराच्या हल्ल्यात एकाचा समावेश आहे. वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर विभागात 5, ब्रह्मपुरी 9, मध्य चांदा 0 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 7 अशा 21 जणांचा मृत्यू झाला. तर बिबट्याच्या हल्ल्यात चंद्रपूर वनविभागात 3 जणांचा मृत्यू झाला. 2024 मध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. यात वाघाच्या हल्ल्यात 24, बिबट्याच्या हल्ल्यात 1 आणि रानडुक्कराच्या हल्ल्यात 1 जणाला जीव गमवावा लागला. वाघाच्या हल्ल्यात चंद्रपूर विभागात 5, ब्रह्मपुरी 8, मध्य चांदा 5 आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्प येथे 6 अशा 24 जणांचा समावेश आहे. चंद्रपूर विभागात बिबट्याच्या हल्ल्यात 1 आणि रानडुक्कराच्या हल्ल्यात 1 जणाचा मृत्यू झाला.