महाराष्ट्र

maharashtra

नाशिकमध्ये हिट अँड रनची घटना, बारदान फाट्याजवळ महिलेला कारची धडक, आरोपी फरार - Nashik Hit and Run

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 10:49 PM IST

Nashik Hit and Run : राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढत आहेत. नाशिकला भाजी आणण्यासाठी जाणाऱ्या महिलेला कारनं धडक दिली. या घटनेत महिला चेंडूसारखी उडून जागीच ठार झाली. या घटनेनंतर कार चालक फरार झाला असून अज्ञात कारचालकाविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik Hit and Run
महिलेला कारची धडक (Etv Bharat Reporter)

नाशिक Nashik Hit and Run :नाशिकमधील गंगापूर रोड जवळील बारदान फाट्याजवळ एक महिला भाजी आणण्यासाठी जात असताना भीषण अपघात झाला. अज्ञात कारनं तिला पाठीमागून धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की, महिला बॉलप्रमाणे हवेत उडून बाजूला पडली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. मात्र, घटनेनंतर कार चालकानं भरधाव वेगानं कार पळवली. हा सर्व प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेनंतर गंगापूर पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखलं झालंय. तसंच अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

सीसीटीव्हीच्या मदतीनं आरोपीला तपास सुरू : "अपघाताची माहिती मिळता आम्ही घटनास्थळी पोहोचलो. त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये एक भरधाव वेगानं येणारी गाडी रस्त्यावरच्या बाजूनं जाणाऱ्या महिलेला धडकताना दिसतेय. यात महिलेच्या जागीच मृत्यू झालाय. घटना घडल्यानंतर कारचालक फरार झालाय. मात्र सीसीटीव्हीच्या आधारे कारचालकास लवकरच आम्ही ताब्यात घेऊ", असं गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी सांगितलं.

पाठलाग करतांना ओठाकतील चालकाचा मृत्यू : एक दिवसापूर्वी नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकासोबत हीट अँड रनची घटना घडली आहे. परराज्यातील अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारचा सिनेस्टाईल पाठलाग सुरू असताना मोठा अपघात घडला. चांदवड तालुक्यातील हरनूल टोल नाक्याजवळ पथकाच्या गाडीला अवैध वाहतूक करणाऱ्या कारनं कट मारल्यानं पथकाची स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या खाली जाऊन पलटली. या अपघातात वाहन चालक कैलास कसबेचा मृत्यू झाला. तर, पथकातील तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यात दोन पोलिसांचा समावेश आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे वाचंलत का :

  1. "आरोपी मिहीर शाहला फासावर लटकवा"; नाखवा कुटुंबाची मागणी - Worli Hit And Run Case
  2. "सत्ता आणि पैशाची गुर्मी"; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांना अश्रू अनावर - Worli Hit And Run
  3. राजधानीनंतर आता उपराजधानीतही 'हिट अँड रन'च्या दोन घटना, दोघांचा मृत्यू - Hit and Run

ABOUT THE AUTHOR

...view details