कोल्हापूर Ambabai Temple Garud Mandap : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्वाचं पीठ असलेल्या 'करवीर निवासिनी अंबाबाई' मंदिरातील गरुड मंडपाच्या (Garud Mandap)दुरुस्तीचं काम सध्या हाती घेण्यात आलं आहे. 1834 ते 1843 या काळात आकाण्यात आलेल्या गरुडमंडपाला अंबाबाई देवीच्या उत्सव काळात अनन्यसाधारण धार्मिक महत्व आहे. अंबाबाई देवीची पालखी मंदिरातून बाहेर पडताना याच गरुड मंडपात काहीकाळ विसावते. गणेशोत्सवात लाडक्या बाप्पांची प्रतिष्ठापनाही याच मंडपात केली जाते. तसेच अक्षय तृतीयेला झोपाळ्यावर अंबाबाईदेवी याच मंडपात विराजमान होते. आता 181 वर्षांचा इतिहास असलेल्या या गरुडमंडपाचं मूळ रूप अबाधीत ठेवून पुनर्बांधणीचं काम हाती घेण्यात आलं आहे.
या काळात बांधले 'गरुड मंडप' :पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीनं 23 कोटींचा निधी खर्च करून अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप, मणिकर्णिका कुंड आणि नगारखाना या धार्मिक महत्त्व असलेल्या स्थळांची पुनर्बांधणी सुरू आहे. या ठिकाणांचा मूळ ढाचा अबाधीत ठेवून देवस्थान समितीन हे काम हाती घेतलं आहे. 9 ते 12 व्या शतकात शिलाहारांची राजधानी राहिलेल्या करवीर नगरीत राजेज्ञ पंडितराव यांच्या कारकिर्दीत हा 'गरुड मंडप' बांधण्यात आला.
कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील गरुड मंडप (ETV BHARAT Reporter) असे पडले मंडपाला नाव : सुबक लाकडी दर्जेदार नक्षीकाम असल्यामुळं आणि पौराणिक ग्रंथात गरुडाचा उल्लेख आढळत असल्यानं या मंडपाला 'गरुड मंडप' असे नाव पडले आहे. याच मंडपाला उत्सव काळात मोठे महत्त्व प्राप्त झाले. कालांतराने गरुड मंडपाचं लाकडी कोरीव काम ठिसूळ पडत चालल्यामुळं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीनं आई अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपाचा ढाचा अबादीत ठेवून पुनर्बांधणी करण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलंय. तर राजा पंडितराव यांनी गरुड मंडपाची उभारणी केल्याचा उल्लेख 'करवीर महात्म्य' या ग्रंथात आढळतो अशी माहिती, अंबाबाई मंदिर अभ्यासक उमाकांत रानिंगा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
नऊ खणांचा तीन आसणी गरुड मंडप: अंबाबाई मंदिरातील महाद्वारकडून मंदिरात प्रवेश करताना भव्य दिव्य स्वरूपाचा 'गरुड मंडप' आई अंबाबाईच्या भाविक भक्तांचा आकर्षणाचा केंद्र आहे. ऐतिहासिक संदर्भात नौखणांचा तीन असणे गरुड मंडपाचं अंबाबाई देवीच्या धार्मिक कार्यात मोठ महत्त्व आहे. लाकडी कलाकुसर असल्यानं आणि सुमारे 180 वर्ष जुनं लाकडी साहित्य असल्यानं या मंडपाचा दर्जा ठिसूळ झाला आहे. यामुळंच देवस्थान समितीनं मूळ ढाचा तसाच ठेवून पुनर्बांधणी करण्याचं नियोजन केलंय. नवरात्रोत्सव काळात देशभरातून आई अंबाबाई चरणी लाखो भावी दाखल होतात. तत्पूर्वी जुना गरुड मंडप उतरवण्यात आला आहे. तात्पुरत्या स्वरूपात याच ठिकाणी मंडप उभारण्यात येणार असल्याचं, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी सांगितलं.
हेही वाचा -
- करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पौराणिक मातृलिंग दर्शनासाठी गर्दी; वर्षातून केवळ पाच वेळाच मिळते दर्शनाची संधी, घ्या दुर्मीळ शिवलिंग दर्शन - Kolhapur Ambabai Temple
- अंबाबाई किरणोत्सव; मावळतीच्या सूर्यकिरणांनी अंबाबाई देवीला घातला अभिषेक
- "कोल्हापूर जिल्हा सहकाराची पंढरी"; राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे गौरवोद्गार, अंबाबाई देवीचं घेतलं दर्शन - Droupadi Murmu Kolhapur Visit