महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापुरात पावसाची बॅटींग; पंचगंगा नदीचा 'इशारा', विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित - kolhapur Rain - KOLHAPUR RAIN

Heavy Rain in kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात सुरू असलेल्या धुंवाधार पावसामुळं कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेली पंचगंगा नदी दुथडी भरुन वाहत आहे. तसंच जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा पुढं ढकलण्यात आल्या आहेत.

Heavy Rain in kolhapur
पंचगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 4:04 PM IST

Updated : Jul 22, 2024, 4:52 PM IST

कोल्हापूर Heavy Rain in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात सुरू असलेल्या धुंवाधार पावसामुळं कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या पंचगंगा नदीनं यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील 11 धरण क्षेत्रांत कोसळत असलेल्या पावसामुळं जिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले आहेत. पावसाची संततधर कायम राहिल्यास पंचगंगा धोका पातळीवर पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी (ETV Bharat Reporter)

स्वयंचलित धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता : राजाराम बंधाऱ्यावर दुपारी एक वाजता पंचगंगेची पाणी पातळी 39 फूट 1 इंच इतकी नोंदली गेली तर धरणक्षेत्रात अतिवृष्टी होत असल्यानं राधानगरी धरण 82 टक्के, काळम्मावाडी 61.55 तर वारणा धरण 77.94 टक्के भरलं आहे. सध्या राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना धरणाचं पाणी लागलं असून पाऊस कायम राहिल्यास कोणत्याही क्षणी स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. स्वयंचलित दरवाजे उघडल्यास राधानगरी धरणातून भोगावती नदीपत्रात होणारा पाण्याचा विसर्ग वाढल्यानं नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. यामुळेच कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष पूरस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. हवामान विभागानं कोकणसह सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज दुपारी पावसानं थोडी उसंत घेतली. यामुळं आठवड्यात पहिल्यांदाच सूर्यदर्शन झालं, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून एनडीआरएफ एक पथक ही कोल्हापुरात तळ ठोकून आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारी बारा वाजेपर्यंत 51.3 मीमी पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस शाहूवाडी तालुक्यात 92.00 मिलिमीटर पाऊस पडला आहे.

शिवाजी विद्यापीठांच्या परीक्षा रद्द : शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळं यंदाच्या मार्च-एप्रिल सत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या सोमवारी (22 जुलै) होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आलीय. तर कोल्हापूर शहरातील सुतारवाडा, जामदार क्लब, गायकवाड वाडा या परिसरात महापालिकेच्या वतीनं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महापुराचा सर्वाधिक फटका बसत असलेल्या चिखली गावात ग्रामपंचायतीच्या वतीनं पूर्व बाधित परिसरात असलेल्या मिळकती धारकांना जिल्हा प्रशासनाकडून नोटीस देण्यात आल्या आहेत. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास आपल्या कुटुंबासह आणि जनावरांना घेऊन सोनतळी याठिकाणी स्थलांतरित होण्यासाठी या नोटिस देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सरपंच रोहित पाटील यांनी दिली.


हेही वाचा :

  1. कोल्हापुरात पुन्हा पूरस्थिती? पंचगंगेच्या इशारा पातळीच्या स्पर्शाला केवळ 2 फूट पाणी शिल्लक - Kolhapur Flood Updates
  2. मुसळधार पावसाचा नागपूरला फटका : दोघांचा मृत्यू, बालक अजूनही बेपत्ता; आज मुसळधार पावसाचा इशारा, शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर - Heavy Rain Hit To Nagpur
Last Updated : Jul 22, 2024, 4:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details