महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

१३ महिन्यात ११० बेपत्ता लोकांचा शोध घेणारे 'सर्च मॅन'; हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर यांची कौतुकास्पद कामगिरी - Head Constable Sudhir Khubalkar - HEAD CONSTABLE SUDHIR KHUBALKAR

Head Constable Sudhir Khubalkar : शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर यांनी, स्वतःच्या कौशल्यानं आणि उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीनं १३ महिन्यात ११० बेपत्ता झालेल्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केलं आहे. वाचा या 'सर्च मॅन'च्या कामगिरीची रंजक गोष्ट..

Head Constable Sudhir Khubalkar
हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2024, 7:18 PM IST

नागपूर Head Constable Sudhir Khubalkar : नागपूर शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर यांनी अवघ्या १३ महिन्याच्या कालावधीत तब्बल ११० बेपत्ता लोकांचा शोध घेतला आहे. त्यामुळं त्यांना नागपूर पोलीस दलात 'सर्च मॅन' अशी ओळख मिळाली. खुबाळकर यांनी स्वतःच्या कौशल्यानं आणि उपलब्ध तंत्रज्ञानाच्या मदतीनं बेपत्ता झालेल्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन केलं आहे.

ईश्वरी सेवा समजून केलं कार्य :असं म्हणतात की, मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर कोणतंही काम अपूर्ण राहात नाही. या सूत्राचा अवलंब करत हेड कॉन्स्टेबल सुधीर खुबाळकर हे आपलं काम निष्ठनं करत आले आहेत. खुबाळकर यांनी नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यात विविध जबाबदाऱ्या अतिशय प्रामाणिकपणे पार पडल्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत आणि चिकाटी बघता शांतीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अत्यंत महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली. ती म्हणजे बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या स्वाधीन करायचं. खुबाळकर यांनी देखील हे काम म्हणजे ईश्वरी सेवा समजूनचं केल्यानं आज त्यांना मोठं यश मिळालं आहे.

प्रतिक्रिया देताना सुधीर खुबाळकर आणि विक्रांत सगणे (ETV BHARAT Reporter)



बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी भारतभर भ्रमण : सुधीर खुबाळकर हे १९९२ साली वयाच्या १९ व्या वर्षी नागपूर पोलीस दलात सहभागी झाले. त्यांनी शहरातील गणेशपेठ, धंतोली, अंजनी एमआयडीसी आणि शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये सेवा दिलेली आहे. खुबाळकर सध्या शांतीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असून जून २०२३ पासून त्यांच्याकडं मिसिंग सेलची जबाबदारी सोपवण्यात आली. गेल्या वर्षीच्या सात महिन्यात त्यांच्याकडं एकूण ५७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी ५४ बेपत्ता लोकांचा त्यांनी यशस्वी शोध घेतला. तर यावर्षी एकूण ४३ पैकी ४२ लोकांना त्यांनी शोधून काढून कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं आहे. बेपत्ता लोकांचा शोध घेत असताना त्यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. याशिवाय ते मध्यप्रदेश, छत्तीसगड, झारखंड, आंध्रप्रदेश आणि जम्मू काश्मीरपर्यंत जाऊन आलेले आहेत.



पोलीस आयुक्तांनी घेतली दखल :हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यात खुबाळकर तरबेज झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीनं जरी काम सोपं झालं असलं तरी अनेकदा गुंतागुंतीच्या भावनिक प्रकरणांमध्ये कधी प्रेमानं तर कधी सबुरीनं वाद मिटवून बेपत्ता झालेल्या व्यक्तीला घरपर्यंत सोडावं लागतं. सुधीर खुबाळकर यांच्या कार्याची दखल नागपूरचे शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी सुध्दा घेतली आहे.

हेही वाचा -

  1. भारतात दररोज 172 मुली होतात बेपत्ता; 170 जणांचं होते अपहरण, जाणून घ्या जागतिक मानवी तस्करीबाबत धक्कादायक माहिती - World Day Against Human Trafficking
  2. पुण्यातील प्रणव कराड अमेरिकेतून बेपत्ता झाल्याचा कुटुंबीयांचा दावा; आई वडिलांची भावनिक साद - PRANAV KARAD Missing
  3. ओशो ध्यान केंद्रात आलेली नेपाळच्या महापौरांची मुलगी गोव्यातून बेपत्ता; दोन दिवसांनंतर पोलिसांनी 'असा' लावला शोध - Missing Nepali Girl

ABOUT THE AUTHOR

...view details