मुंबई Grandfather Rape:मुंबईतील पश्चिम उपनगरातील कुरार पोलीस ठाणे परिसरात 19 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी 58 वर्षीय आरोपीविरुद्ध भारतीय दंड संविधान कलम 376 (२) (एफ) (एन), 354, 354ए, 323, 504,506 तसंच पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी आजोबाला अटक करण्यात आली आहे.
पीडितेला जीवे मारण्याची धमकी : पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घरी एकटी असताना आरोपी तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा. आरोपी 2014 पासून मुलीचा लैंगिक छळ करत असं पीडितेचं म्हणणं आहे. तसंच घटनेची कोठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीनं दिल्याचं पीडितेनं पोलिसांना सांगितलं. त्यामुळं घडलेला प्रकार पीडितेनं कधीही कोणाला काहीही सांगितला नव्हता. आरोपी हा तक्रारदार पीडितेचा सावत्र आजोबा असून तो शेजारच्या घरात राहत असे. 2014 पासून तो पीडितेचा लैंगिक छळ करत होता, असं तरुणीनं दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. पीडितेनं आक्षेप घेतल्यास तो तिला मारहाण करायचा, असा आरोप पीडितेनं तक्रारीत केला आहे.