महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या कारला अपघात; आजोबासह चिमुकल्या नातवाचा मृत्यू

Car Accident On Medha Satara Road : खंडोबाच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या भरधाव कारचा गुरूवारी साताऱ्यात भीषण अपघात झाला. या अपघातात आजोबासह तीन महिन्यांच्या नातवाचा मृत्यू झालाय.

Car Accident On Medha Satara Road :
मेढा सातारा रोडवर अपघात

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 8:51 AM IST

साताराCar Accident On Medha Satara Road : मेढा-सातारा रस्त्यावरील हमदाबाज नजीकच्या वळणावर भाविकांची भरधाव कार ओढ्याच्या पुलावरील कठड्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात आजोबांसह तीन महिन्यांचा नातू ठार झाला असून, एकाच कुटुंबातील चौघजण जखमी झाले आहेत. हे सर्वजण कराड तालुक्यातील पाल येथे खंडोबाच्या दर्शनाला निघाले होते. या अपघातातील मृत आणि जखमी हे सावली (ता. जावळी) गावचे आहेत. पुलावरील कठड्याला कार धडकून झालेल्या अपघातात नामदेव पांडुरंग जुनघरे (वय 58) आणि त्यांचा नातू आद्विक अमर चिकणे (वय 3 महिने, रा. सावली, ता. जावली), अशी मृतांची नावं आहेत. तर, मुलाची आजी सुवर्णा नामदेव जुनघरे, आई पुजा अमर चिकणे व मामा प्रसाद नामदेव जुनघरे (सर्व रा. सावली) व अन्य एक, असे चौघेजण जखमी झाले आहेत.

आजोबा व नातवाचा मृत्यू : चारचाकी गाडीने काल गुरूवार दुपारी ते पाल (ता. कराड) येथे देवदर्शनाला निघाले होते. या भाविकांची भरधाव कार हमदाबाज हद्दीतील वळणावर असलेल्या ओढ्याच्या कठड्याला धडकली. या अपघातात आजोबा व नातवाचा मृत्यू झाला. तर, बाकीचे जखमी झाले आहेत. जखमींना नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. रात्री उशीरा मृतदेहांचं शवविच्छेदन झालं. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.

सातारा ग्रामीण पोलीस अपघाताची नोंद : ठाण्यात नातेवाईकांचा आक्रोश'हृदय पिळवटून टाकत होता. या भीषण अपघाताची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाच्या पंचनाम्याला सुरूवात केली. तसंच, सातारा-जावळी मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद सातारा ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता मेणकर व हवालदार विशााल मोरे या अपघाताचा तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details