दुर्ग(छत्तीसगड) Sangli Businessman Suicide : छत्तीसगडमधील भिलाई येथील सुपेला पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील एका व्यावसायिकानं आत्महत्या केलीय. माहिती मिळताच सुपेला पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. हा व्यावसायिक सांगली जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.
हॉटेलच्या खोलीत आत्महत्या : "शुक्रवारी व्यावसायिक गोविंद पवार हे सुपेला येथील एका हॉटेलमध्ये पोहोचले होते. तिथं त्यांनी रात्रीचा मुक्काम केला. व्यावसायानिमित्त ते अनेकवेळा सुपेला येथे येत असतात. ते कायम या हॉटेलमध्ये राहायचे. शनिवारी सकाळी त्यांनी दरवाजा न उघडल्यानं हॉटेल व्यवस्थापकानं मास्टर चावीनं दरवाजा उघडला. त्यानंतर गोविंद पवार यांनी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसून आलं," अशी माहिती पोलिसांनी दिली.
गोविंद पवार हे 2 मार्चपासून हॉटेलमध्ये राहत होते. या हॉटेलमधून ते सतत त्यांच्या कंपनीच्या मार्केटिंगचं काम करत होते. गोविंद पवार यांच्या खोलीतून जेवणाची ऑर्डर न मिळाल्यानं हॉटेल व्यवस्थापकाला संशय आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या रुमचा दरवाजा मास्टर चावीनं उघडण्यात आला. तेव्हा आतमध्ये गोविंद पवार यांचा मृतदेह आढळून आला - राजेश मिश्रा, टीआय, सुपेला पोलीस स्टेशन