महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोरेगावात पती पत्नीचा आढळला मृतदेह; पत्नीची हत्या करुन पतीनं आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय - Goregaon Couple Found Dead - GOREGAON COUPLE FOUND DEAD

Goregaon Couple Found Dead : गोरेगावात पती आणि पत्नीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. सेल्समन पतीनं फिजिओथेरपिस्ट पत्नीचा खून करुन त्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पती किशोर पेडणेकर हा तणावात असल्याचा संशयही पोलिसांना आहे.

Goregaon Couple Found Dead
संग्रहित छायाचित्र (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 3, 2024, 8:03 AM IST

मुंबई Goregaon Couple Found Dead : पश्चिम उपनगरातील गोरेगावातील इमारतीत पती पत्नीचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली. किशोर पेडणेकर आणि राजश्री पेडणेकर असं मृतदेह आढळून आलेल्या पती-पत्नीची नावं आहेत. या घटनेतील पत्नीचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये तर, पतीचा मृतदेह इमारतीच्या आवारात आढळून आला आहे. त्यामुळे पत्नीचा खून करुन पतीनं इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी या दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. याबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.

गोरेगावात आढळला पती पत्नीचा मृतदेह :गोरेगाव पश्चिम इथं पत्नीची हत्या करुन पतीनं आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. टोपीवाला बिल्डिंग कॉम्प्लेक्समध्ये किशोर पेडणेकर नावाच्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानं ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून किशोर पेडणेकर यांना रुग्णालयात नेलं असता त्यांच्या खिशातून घराच्या चाव्या निघाल्या. पोलिसांनी घरात जाऊन पाहिलं असता त्यांच्या पत्नी राजश्रीचा मृतदेहही घरात पडून असल्याचं दिसलं. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. गोरेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "किशोर पेडणेकर यांनी अगोदर पत्नी राजश्रीचा गळा आवळून खून केला आणि नंतर इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली," असा संशय पोलिसांना आहे. राजश्री पेडणेकर या व्यवसायानं फिजिओथेरपिस्ट होत्या."

नातेवाईकाला मेसेज करून दिली मालमत्तेची माहिती :आत्महत्या करण्यापूर्वी किशोर पेडणेकर यांनी एका नातेवाईकाला मेसेज करुन त्यांची बँक खाती, मालमत्तेची माहिती दिली. तसंच फ्लाइटचं तिकीटही पाठवून दिल्लीत राहणाऱ्या आपल्या मुलाला रात्री 9 वाजतापर्यंत घेऊन येण्यास सांगितलं, असंही पोलीस तपासात उघडकीस आलं आहे. त्यांनी आत्महत्या केली, याचा तपास पोलीस करत आहेत.

राजश्री पेडणेकर होत्या फिजिओथेरपिस्ट :गोरेगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजश्री पेडणेकर या व्यवसायानं फिजिओथेरपिस्ट असून त्या पतीसोबत गोरेगाव इथल्या टोपीवाला बिल्डिंगमध्ये राहत होत्या. तिसऱ्या मजल्यावरील घरात त्यांचा मृतदेह आढळून आला असून किशोर पेडणेकर यांचा मृतदेह इमारतीखाली पडलेला आढळून आला. पोलिसांनी संबंधित प्रकरणात त्यांच्या मुलाला मुंबईला बोलावलं असून त्याचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. प्राथमिक तपासात प्रथम महिलेचा खून झाला असावा आणि नंतर पतीनं आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी सांगितले की, तपासादरम्यान असं आढळून आलं की किशोर पेडणेकर हे डिप्रेशन आणि इतर काही आजारांनी त्रस्त होते. डॉ राजश्री पेडणेकर या मालाड इथल्या एका आरोग्य संस्थेत प्रॅक्टिस करत होत्या. त्यांचा मुलगा दिल्लीत राहतो. एवढं मोठं पाऊल उचलण्याआधी किशोर पेडणेकर यांनी एक मेसेजही पाठवला आहे. ज्यामध्ये त्यांना मालमत्तेचा तपशील आणि नॉमिनीचं नाव पाठवलं आहे.

हेही वाचा :

  1. २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून निर्घृण खून; नातेवाईकांचा 'लव्ह जिहाद'चा आरोप - Girl Murder Case Uran
  2. बहिणीची छेड काढताना बघितलं, आरोपी नातेवाईकानं चिमुकल्या भावाला संपवलं - Thane Murder Case
  3. वरळी स्पामधील हत्या प्रकरण: मृत वाघमारेनं मांड्यांवर 22 शत्रूंची नावं टॅटूत कोरली, पोलिसही चक्रावले - Guru Siddappa Ambadas Waghmare

ABOUT THE AUTHOR

...view details