महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घाटकोपर होर्डिंग प्रकरण: आरोपी भावेश भिंडेला सत्र न्यायालयाकडून जामीन

घाटकोपर येथील होर्डिंग प्रकरणी अटकेत असलेला इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) याला सत्र न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Ghatkopar Accident Case
घाटकोपर होर्डिंग प्रकरण (ETV Bharat)

मुंबई: घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेला भावेश भिंडेला सत्र न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. भिंडेने अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. तसेच, अटक बेकायदा ठरवून तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही केली होती. मात्र, भिंडेला करण्यात आलेली अटक ही कायदेशीरच असल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट करून त्याची याचिका फेटाळली होती. त्यानंतर, भिंडे याने पुन्हा एकदा सत्र न्यायालयात जामिनासाठी याचिका केली होती. सत्र न्यायालयाने शनिवारी त्याच्या जामीन अर्जावर निर्णय देताना त्याला जामीन मंजूर केला. याबाबतचा न्यायालयाचा सविस्तर आदेश उशिरापर्यंत उपलब्ध झाला नाही.

जामिनावर सुटका करण्याची केली मागणी :आपल्याला बेकायदेशीररीत्या ताब्यात ठेवण्यात आले होते, असा दावा करून भिंडेने अटक बेकायदा ठरवण्याची आणि तातडीने जामिनावर सुटका करण्याची मागणी केली होती. भिंडेला १६ मे रोजी राजस्थानमधील उदयपूर येथून अटक करून मुंबईत आणण्यात आल्याचा युक्तिवाद त्याचे वकील रिजवान मर्चंट यांनी केला होता. परंतु, भिंडे याला १७ मे रोजीच अटक करण्यात आली होती.

काय घडली होती दुर्घटना? :घाटकोपर येथील होर्डिंग कोसळल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने भावेश भिंडेला राजस्थानमधील उदयपूर येथून अटक केली आहे. या घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला. आरोपी भावेश भिंडे यांच्या इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग उभारले होते. हे होर्डिंग 13 मे रोजी धुळीच्या वादळात पेट्रोल पंपावर कोसळले होते. याप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान 304, 338, 337 आणि 34 अन्वये सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  1. हेही वाचा -
  2. घाटकोपर होर्डिंग प्रकरणात जखमी झालेल्या रिक्षाचालकाचा मृत्यू, दुर्घटनेचा एसआयटी करणार तपास - ghatkopar hoarding case
  3. घाटकोपर होर्डिंग प्रकरण: फरार आरोपी जान्हवी मराठेसह आणखी एकास गोव्यातून अटक - Ghatkopar Hoarding Case
  4. घाटकोपर होर्डिंग प्रकरण: फिटनेस सर्टिफिकेट देणाऱ्या इंजिनिअरला मुलुंडमधून केली अटक - Ghatkopar Hoarding Case

ABOUT THE AUTHOR

...view details