महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गँग ऑफ वासेपूर नव्हे हे तर गँग ऑफ नागपूर ; उपराजधानीत टोळी युद्ध भडकलं, अंदाधुंद गोळीबार - GANG WAR IN KHAPARKHEDA NAGPUR

नागपुरात टोळी युद्धाच्या भडक्यातून दोन गँगमध्ये अंदाधुंद गोळीबार झाला. या गोळीबारात एका गुंडाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री कापरखेडा इथं घडली.

Gang War In Khaparkheda Nagpur
घटनास्थळावर पडलेली पिस्तूल (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2025, 11:04 AM IST

नागपूर :उपराजधानीत शेखू आणि हिरणवार टोळीतील युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. गुरुवारी खपरखेडा भागातील बाभूळखेडा शिवारामध्ये शेखू टोळीच्या गुंडांनी हिरणवार टोळीचा पाठलाग करत अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात पवन हिरणवार या तरुणाचा मृत्यू झालाय. घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. अद्यापही या प्रकरणी कुणाला अटक झालेली नसली, तरीही काही संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

याच गाडीवर करण्यात आला हल्ला (Reporter)

पवन हिरणवार याच्यावर विविध गुन्हे दाखल :गुरुवारी खापरखेडा परिसरात करण्यात आलेल्या अंदाधुंड गोळीबारात पवन हिरणवार याचा मृत्यू झाला आहे. पवन हिरणवार हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याच्यावर हत्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस तपासात पुढं आली आहे. पूर्व वैमनस्यातून त्याची हत्या झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

घटनास्तळावर पडलेली पिस्तूल (Reporter)

टोळीचा सिनेस्टाईल गोळीबार : पवन धीरज हिरणवार दोन मित्रांसह कारनं जात होता. यावेळी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाभूळखेडा शिवारात तीन दुचाकीनं आलेल्या पाच आरोपींना त्यांचा पाठलाग सुरू केला. पवन हिरणवार वेगानं कार पळण्याचा प्रयत्न करत असतानाच आरोपींनी कारवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या गोलीबारात एक गोळी पवन हिरणवारला लागली. त्यामुळे पवन हिरणवारचा घटनास्थळीचं मृत्यू झाला आहे, तर दोघं जखमी झाले आहेत.

याच गाडीवर करण्यात आला हल्ला (Reporter)

गोळीबारानंतर आरोपी फरार :गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. गोळीबाराचा आवाज ऐकून जवळच्या शेतात काम करणाऱ्या नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर खापरखेडा पोलीस आणि गुन्हे शाखेचं पथक घटनास्थळी दाखल झालं. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. काही संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.

हेही वाचा :

  1. नागपुरात दुहेरी हत्याकांड, पोटच्या पोरानं केली आई-वडिलांची हत्या
  2. नागपुरातील हॉटेलमध्ये तरुणीचा संश्यास्पद मृत्यू; मित्राचा शोध सुरू
  3. दुचाकी उशिरा परत केल्याच्या वादातून बापलेकानं तरुणाला संपवलं - Son and Father Killed Youth

ABOUT THE AUTHOR

...view details