महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या, ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी तयार करत होते पॉर्न व्हिडिओ - Porn Shooting Racket in Lonavala - PORN SHOOTING RACKET IN LONAVALA

Porn Film Shooting Racket in Lonavala : लोणावळा हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध आहे. लोणावळ्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. लोणावळ्यातील एका बंगल्यात पॉर्न व्हिडिओ बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. यामुळे लोणावळ्यात एकच खळबळ उडाली आहे.

पॉर्न व्हिडीओ तयार करणारी टोळीला ठोकल्या बेड्या
पॉर्न व्हिडीओ तयार करणारी टोळीला ठोकल्या बेड्या

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 10:22 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी

लोणावळा :Porn Film Shooting Racket in Lonavala : येथे पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून लोणावळ्यातील बंगल्यावर हा सर्व धंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणी एकत्र आले होते. ते पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. दरम्यान, काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. त्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी यामध्ये 15 पैकी 13 जणांना अटक केली आहे.

कॅमेरा आणि इतर साहित्यही जप्त : धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून एका बंगल्यात हे रॅकेट सुरू होतं. भारतातील विविध राज्यातील काही तरुण लोणावळ्यात एकत्र आले होते आणि हे उद्योग करत होते. (Porn Film Shooting Racket) सरळ-सरळ पॉर्न व्हिडिओ शूट करत होते. महत्वाचं म्हणजे पॉर्न व्हिडिओ बनवणं भारतात गुन्हा आहे. त्यावर पूर्णपणे बंदी आहे. तरीही या लोकांनी हे व्हिडिओ बनवले आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळ गाठून संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं. त्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली आहे. पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी वापरलेला कॅमेरा आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आलं आहे. याशिवाय पोलिसांनी यातील काही व्हिडिओही तप्त केले आहेत.

सर्व लोक भारतातील विविध राज्यातील : पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील एका बंगल्यात विविध राज्यातील काही तरुण जमले होते. हे सर्वजण या बंगल्यात ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी पॉर्न व्हिडिओ बनवत होते. पॉर्न व्हिडिओ बनवणं भारतात गुन्हा आहे. (Porn Film in Lonavala) अश्लील व्हिडिओंवर बंदी आहे. हे माहीत असूनही 15 तरुणांची ही टोळी बंगल्यात पॉर्न व्हिडिओ बनवत होती. यामध्ये अटक करण्यात आलेल्यांमध्ये पाच मुलींचाही समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या सर्व आरोपींविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details