महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 26, 2024, 10:39 PM IST

ETV Bharat / state

उरण परिसरातील बांधबंदिस्ती फुटल्यानं चार कामगार चिखलात रुतले; दोघे जण जागीच ठार

उरण तालुक्यातील वेश्वी आदिवासीवाडीतील कामगार दिघोडे-धुतूम खाडी किनाऱ्यावर मच्छी पकडण्यासाठी गेली असताना किनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटली. या दुर्घटनेनंतर चिखलात चार कामगार रुतल्याची घटना घडली. त्यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना आज सोमवार (दि. 26 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

उरण येथील घटना
उरण येथील घटना

नवी मुंबई :उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाडीतील कामगार ही नेहमीप्रमाणे मासेमारी करण्यासाठी दिघोडे-धुतूम ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावर सोमवारी सायंकाळी गेली होती. मात्र, खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने चिखलात कामगार रुतली गेल्याची दुर्दैवी घटना घडली.

मृतदेह बाहेर काढण्याचं कार्य सुरू : या घटनेत दोन कामगार दगावल्याची माहिती मिळत असून, उरण पोलिसांनी तसेच वेश्वी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील तांबोळी, धुतूम ग्रामपंचायतीचे सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य यांनी घटनास्थळी धाव घेऊन आदिवासी मुलांचे जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दोघांना तात्काळ उरणच्या इंदिरा गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, घटनास्थळी अंधार पडल्याने शोधकार्यांत अडचणी निर्माण झाल्या. रात्री उशिरापर्यंत दोन कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्याचं कार्य सुरु राहणार आहे.

चिखलात रुतल्यानं दोघांचा मृत्यू: नवी मुंबई परिमंडळ 2 उरण पोलीस ठाणे हद्दीतील गउठून सदानंद कातकरी, सूरज शाम वाघमारे, राजेश लक्ष्मण वाघमारे, आविनाश सुरेश मुरकुटे, हे प्रितम मुंबईकर यांच्या वेश्वी, ता. उरण येथील विट भट्टीवर कामाला होते. हे चौघं दादरपाडा ते धुतुम गावाच्या खाडीच्या मध्यभागी अंदाजे 30 ते 35 वर्ष जुना साकवच्या खाली मासे पकडत असताना या खाडीवर असलेला साकव त्यांच्या अंगावर पडल्याने चारही जण गंभीर जखमी झाले. यामध्ये राजेश लक्ष्मण वाघमारे (वय. 22) अविनाश सुरेश मुरकुटे (वय. 30) या दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यांचे मृतदेह इंदिरा गांधी रूग्णालय, उरण येथे पाठविण्यात आले आहेत. गुरुनाथ कातकरी आणि सुरज शाम वाघमारे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details