महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पुण्यात तरुणीचा निर्घृण खून, हातपाय कापून धड फेकलं नदीपात्रात, नागरिक हादरले - Found Girls Body Parts In Pune - FOUND GIRLS BODY PARTS IN PUNE

Found Girls Body Parts In Pune : पुण्यातील खराडी परिसरात एक तरुणीचं धड वाहत आल्यानं नागरिकांना मोठा हादरा बसला आहे. या तरुणीचे हात, पाय तोडून तिचं धड नदीत फेकून देण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Found Girls Body Parts In Pune
प्रतिकात्मक छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2024, 1:46 PM IST

Updated : Aug 27, 2024, 2:36 PM IST

पुणे Found Girls Body Parts In Pune :शहरातून खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार समोर आलाय. एका तरुणीचा निर्घृण खून करुन तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले आहेत. खराडी येथील नदीपात्रात तरुणीचं धड पोलिसांना आढळलं असून खून झालेल्या तरुणीचं वय अंदाजे 18 ते 30 इतकं असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे.

तरुणीचं धड नदीत आलं वाहत : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मुळा मुठा नदीपात्रात खराडी परिसरातील सोसायटीजवळ नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह वाहत आल्यानं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तरुणीचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांकडून सदर तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू असून आरोपींचा शोध देखील सुरु करण्यात आला आहे. सध्या खडकवासला धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात असल्यानं नदीत प्रवाह जास्त प्रमाणात चालू आहे. परंतु पावसाचा जोर कमी झाल्यानं धरणातील पाण्याचा विर्सग कमी करण्यात आला. त्यामुळे पाणी पातळी कमी होऊ लागल्यानंतर खराडी भागात बांधकाम ठिकाणावर काम करत असलेल्या काही मजुरांना नदीपात्रात हा मृतदेह दिसून आला. पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहे.

तरुणीचे हात पाय तोडून फेकले :मुळा मुठा नदीत वाहत आलेलं आलेलं तरुणीचं धड हे 18 ते 30 वयाच्या दरम्यानच्या तरुणीचं आहे. या तरुणीचे हात पाय तोडल्याचं दिसत आहे. मात्र हे हात आणि पाय नदीच्या पात्रात आढळून आले नाहीत. त्यामुळे या तरुणीचा निर्घृण खून करुन त्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

  1. कोल्हापूर हादरलं! बिहारी जोडप्याच्या अल्पवयीन मुलीची हत्या, मामानेच अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा अंदाज - MINOR GIRL MURDER
  2. २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार करून निर्घृण खून; नातेवाईकांचा 'लव्ह जिहाद'चा आरोप - Girl Murder Case Uran
  3. एकतर्फी प्रेमातून तरुणीचा खून : प्रेमाला नकार दिल्यानं नराधमानं घरात घुसून तरुणीला भोसकलं - Girl Stabbed To Death
Last Updated : Aug 27, 2024, 2:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details