महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचं निधन, पाम बीचवर सायकलिंग करताना टॅक्सीनं दिली धडक

Avtar Saini Dies in Cycling Accident : इंटेल कंपनीचे भारतातील माजी प्रमुख अवतार सैनी यांचं वयाच्या 68 व्या वर्षी निधन झालंय. नवी मुंबईमध्ये सायकलिंग करताना एका टॅक्सीनं त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

former intel india head Avtar Saini dies in fatal cycling accident
इंटेल इंडियाचे माजी प्रमुख अवतार सैनी यांचं निधन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 5:11 PM IST

नवी मुंबई Avtar Saini Dies in Cycling Accident : इंटेल इंडियाचे माजी प्रमुख, चिप डिझायनर अवतार सैनी यांचं नवी मुंबईतील पाम बीच रोडवर सायकलिंग करत असताना टॅक्सीनं धडक दिल्यानं अपघाती निधन झालं आहे. अवतार सैनी हे 68 वर्षांचे होते. सैनी यांच्या पश्चात मुलगा, सून आणि मुलगी असा परिवार आहे.

मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमध्ये केलं अभियांत्रिकी शिक्षण : अवतार सैनी हे मुंबईतील चेंबूर येथील रहिवासी होते. त्यांचं बालपण मुंबईतील चेंबूर परिसरातच गेलं. इंटेलच्या 386 आणि 486 मायक्रोप्रोसेसर, पेंटियम प्रोसेसर डिझाइनमध्ये सैनी यांचा मोलाचा वाटा आहे. तसंच ते 'इंटेल इंडिया’चे माजी अध्यक्ष होते. सैनी यांनी मुंबईतील व्हीजेटीआयमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. 1982 पासून ते 2004 पर्यंत सैनी हे इंटेलमध्ये कार्यरत होते. तसंच ते चेंबूर अमॅच्युअर सायकलिंग ग्रुपचे सदस्य देखील होते.

नोकरी सोडल्यानंतर ट्रेकिंगती गोडी : कॉर्पोरेट मधील नोकरी सोडल्यानंतर अवतार सैनी यांनी ट्रेकिंगला अधिक वेळ देण्यास सुरुवात केली. तसंच आपली सायकल घेऊन ते दूरवर जायचे. त्यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार अवतार सैनी यांनी पत्नीच्या निधनानंतर सायकलस्वारी आणि ट्रेकिंग करण्यास अधिक वेळ दिला.

बुधवारी पहाटे सायकलिंग करताना झाला अपघात : बुधवारी (28 फेब्रुवारी) सकाळी 5:50 वाजता अवतार सैनी हे सायकलिंग करत होते. नेरुळ जंक्शन आणि एनआरआय सीवूड्स सिग्नलच्या मध्ये असताना त्यांच्या सायकलला एका टॅक्सीनं धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सैनी यांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी टॅक्सी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सैनी यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलाय, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.

हेही वाचा -

  1. Student Died In Road Accident : दहावीचा शेवटचा पेपर देवून घरी जाताना अपघात.. विद्यार्थ्याचा मृत्यू
  2. बीडमध्ये एसटी बसची मोटार सायकलला धडक, दोन जण जागीच ठार
  3. अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू; राळेगा-मेटीखेडा रोडवरील घटना

ABOUT THE AUTHOR

...view details