पुणे Pune Girls Hostel Fire News : पुणे शहरातील कुमठेकर रस्त्यालगत असणाऱ्या मुलींच्या चार मजली इमारतीला गुरुवारी (6 जून) मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीतून 48 मुलींची सुखरुप सुटका करण्यात आली. मात्र, यादरम्यान एकाचा गुदमरून मृत्यू झाला. सागर कुलकर्णी (वय 45) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.
नेमकं काय घडलं? :या प्रकरणी अधिक माहिती अशी की, कुमठेकर रस्त्यालगत एका चार मजली इमारतीत खासगी शैक्षणिक संस्था आहे. या इमारतीत खालच्या मजल्यावर अभ्यासिका, दुसऱ्या मजल्यावर स्टडी रूम आणि इतर दोन मजल्यावर या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गुरुवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास या इमारतीला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं.
48 मुलींची सुखरुप सुटका : मिळालेल्या माहितीनुसार, आग लागली तेव्हा इमारतीत 48 मुली होत्या. तळमजल्यावर आग लागल्यानं मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले होते. त्यामुळं या इमारतीत राहणाऱ्या मुलींनी टेरेसवर धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्व मुलींना शेजारील इमारतीवरुन शिडीच्या सहाय्यानं बाहेर काढलं. मात्र, बचावकार्य संपल्यानंतर याच इमारतीत राहणारा सागर कुलकर्णी दिसला नसल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांनी या इमारतीत पुन्हा शोधमोहीम सुरू केली आणि काही वेळातच त्यांना एका खोलीत सागर बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा -
- Pune Fire : फटाके फोडताना घ्या काळजी! लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात 23 ठिकाणी आगीच्या घटना
- Pune fire News: साखरझोपेत असताना दुकानाला लागली आग, एकाच कुटुंबातील चौघांचा जळून मृत्यू
- Pune Fire News: येवलेवाडीत गोडाऊनमधे लागली भीषण आग; फॅब्रिक मटेरियलने घेतला पेट