मुंबईFarooq Abdullah :देशासाठी स्वातंत्र्य सेनानी देणाऱ्या भूमीला नमन करतो असं म्हणत काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी सभेला संबोधित केले. आपला देशात सर्वधर्म समाजाचे लोक राहत आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काश्मीर ते कन्याकुमारी तसेच मणिपूर ते मुंबई या मार्गे काढली. हा आपला भारत आहे. भारताला, लोकशाही वाचवायची आहे. तसेच ईव्हीएम मशीन चोर आहे. तसेच जेव्हा आपण ईव्हीएमवर मतदान करणार त्यावेळी आपण मत नेमकं कोणाला टाकले ते तपासून पहावे.
निवडणूक आयोगाला स्वतंत्र करणार :देशात इंडिया आघाडी सरकार आल्यानंतर EVM पासून मुक्ती करू. त्यासोबतच निवडणूक आयोगाला देखील स्वतंत्र करणार असल्याचे ते म्हणाले. इंडिया आघाडी मजबूत ठेवून देशाला वाचवायचे आहे. राहुल गांधी दिल्लीत बसून भारत बघत नाही तर गावात जाऊन पाहतात. मोदी सरकारने इंधन दर कमी केले. त्याला कारण फक्त डोळ्या समोर असलेल्या निवडणुका आहेत, असं फारूक अब्दुल्ला म्हणाले.
मोदी खोटं बोलण्याची फॅक्ट्री - तेजस्वी यादव :भारत जोडो न्याय यात्रा काढल्याबद्दल तेजस्वी यादव यांनी सुरुवातीला राहुल गांधी यांना धन्यवाद दिले. एका बाजूला नफरत पसरविली जातेय. लोकांनी निवडून दिलेल्या सरकारांना केंद्रीय एजन्सी मार्फत पाडले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधी यांनी नफरत संपविण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून काम केले. मोहब्बत की दुकान सुरू केले. लोकांना घाबरवले जातेय. आमचं लक्ष मोदींना हरविणे नाही तर त्यांच्या विचारधारा हरविण्याचे काम करायचे. आम्ही मोदींच्या धमक्यांना घाबरणार नाही. सत्तेत असो किंवा नसो आपल्याला लोकात जाऊन काम करावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्यात ऑपरेशन लोटस झाले. त्यानंतर आता सत्तेत असलेले कोणी लोक लीडर नाही डीलर दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत बिहार राज्यात धक्का देणारा निकाल देणार, असं तेजस्वी यादव म्हणाले.