महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या; काँग्रेसच्या चेन्नीथला यांचा गंभीर आरोप - CONGRESS RAMESH CHENNITHALA

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही, काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही रमेश चेन्नीथला यांनी दिली.

Congress ramesh Chennithala
महाविकास आघाडी (ETV Bharat FIle Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 2, 2024, 2:06 PM IST

Updated : Nov 2, 2024, 3:43 PM IST

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणाचा शेतकऱ्यांना फटका बसला असून, देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात झाल्यात. या आत्महत्यांना नरेंद्र मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केलाय, मुंबईत ते पत्रकार परिषदेत बोलत होते. वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेल्या माजी मंत्री अनिस अहमद यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केलाय. अंधेरी पश्चिम मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले माजी नगरसेवक मोहसीन हैदरही यावेळी उपस्थित होते. विशेष म्हणजे ते माघार घेणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

दोन हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान मंजूर: राज्य सरकारकडून कांदा उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आला असून, कापसाला एमएसपीपेक्षा कमी दर देण्यात आलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिक्विंटल पाच हजार रुपये अनुदानाची सरकारकडे मागणी करण्यात आली होती. मात्र महायुती सरकारने केवळ दोन हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान मंजूर केले. मात्र ते अनुदानदेखील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असल्याचंही चेन्नीथला यांनी सांगितलं.

राज्यातील जनता महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली :बंडखोरी केलेल्या नेत्यांशी चर्चा केली जात असून, बंडखोर उमेदवार अर्ज मागे घेतील, असे ते म्हणाले. राज्यातील जनता महायुतीच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळली आहे. तसेच या निवडणुकीत ते महाविकास आघाडीला विजयी करणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. केंद्र सरकारच्या आणि राज्यातील महायुती सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय, असा आरोप त्यांनी केलाय. आमचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

मोदी देशातील जनतेची दिशाभूल करतात: 6 नोव्हेंबर रोजी मुंबईत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसच्या गॅरंटी जाहीर करण्यात येणार आहेत. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहतील, अशी माहिती त्यांनी दिलीय. मुंबईतील सभेपूर्वी नागपूरमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत संविधान संरक्षण संमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसने जाहीर केलेल्या गॅरंटी योजनांची पूर्ण अंमलबजावणी होत असल्याचे ते म्हणालेत. राज्यातील महायुती सरकारने राज्याला लुटले असून, प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरची किंमत पाचशे रुपये करून जनतेचे हाल केलेत. त्यामुळे या सरकारला सत्तेवरून हटवून नवीन सरकार आणण्याचा निर्णय जनतेने घेतलाय, असे ते म्हणालेत.

पक्षात फूट पाडली हा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ: एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सर्व काही मिळाले, मात्र तरी त्यांनी पक्षात फूट पाडली हा त्यांचा वैयक्तिक स्वार्थ होता, असा आरोप त्यांनी केलाय. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत विदारक झाल्याचा आरोप चेन्नीथला यांनी केलाय. माजी मंत्री अनिस अहमद यांनी काही कारणांमुळे आपण पक्षातून काही दिवस बाहेर गेलोय. मात्र लगेच पुन्हा परत आल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय. भाजपाने विधानसभेच्या उमेदवारी यादीत एकाही मुस्लिम उमेदवाराला संधी दिली नसल्याकडे अनिस अहमद यांनी लक्ष वेधलंय.

हेही वाचा

  1. मंदिरात फटाक्यांच्या आतषबाजीदरम्यान भीषण स्फोट; 150 हून अधिक जखमी, तर 8 गंभीर
  2. चिप्सच्या आमिषानं नराधमाचा चिमुकलीवर अत्याचार : नागरिकांनी दरवाजा तोडून केली पीडितेची सुटका
Last Updated : Nov 2, 2024, 3:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details