महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"तरुणांनो गाव सोडा आणि शहरात हमाली करा"; अर्थसंकल्पावर शेतकरी नेत्यांची टीका - Budget 2024 - BUDGET 2024

Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत 2024 चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांकडून अर्थसंकल्पाचे समर्थन होत आहे. तर काही जणांनी या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली आहे.

Budget 2024
निर्मला सीतारमण आणि शेतकरी नेते विजय जावंदिया (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 9:32 PM IST

नागपूर Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर शेतकरी नेत्यांनी टीका केलीय.आजच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी कुठलीही महत्त्वाची घोषणा नाही. हमीभाव तेच आहेत, इतर योजनाही जुन्याच आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून काहीच मिळालं नाही."आजचा अर्थसंकल्प म्हणजे तरुणांनो गाव सोडा आणि शहरात येऊन हमाली करा" अश्या शब्दात शेतकरी नेते विजय जावंदिया (Vijay Javandia) यांची टीका केली आहे.

प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते विजय जावंदिया (ETV BHARAT Reporter)

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. ग्रामीण भागातील तरुणांनो शहरात या, अत्यल्प दरात विकास प्रकल्पात मजुरी करा आणि मोफत धान्य योजनेच्या जोरावर जगा. सरकारनं आजच्या अर्थसंकल्पातून गुलामगिरीची नवी व्याख्या केली आहे. - विजय जावंधिया, शेतकरी नेते



तरुणांसाठी गुलामगिरीची व्यवस्था : नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे ग्रामीण भागातील तरुणांनी शहरात यावं आणि सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रकल्पांमध्ये अत्यल्प दरात मजुरी करावी. तसेच मोफत धान्याच्या योजनेचा लाभ घ्यावा आणि नवी गुलामगिरी करावी अशी टीका, शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केली आहे. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा काम करण्यात आलं आहे.



घोषणा केली पण पुढची व्यवस्था कोण करेल? :एका बाजूला केंद्र सरकार शेतकऱ्यांनी डाळ आणि तेलबियांचे उत्पादन वाढवावे अशी अपेक्षा करत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली डाळ आणि तेलबिया खरेदी करण्याची हमी केंद्र सरकार देत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी कोणाच्या भरवश्यावर डाळी आणि तेलबियांचे उत्पादन करावे असा सवाल जावंधिया यांनी विचारला आहे.

हेही वाचा -

  1. "सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प "; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक - Union Budget 2024
  2. अर्थसंकल्प सादर होताच शेयर बाजार ढासळला; काय आहेत नेमकी कारणं? - Budget Impact on Share Market
  3. "अर्थसंकल्पात योजनांचा पाऊस, मात्र...."; अर्थसंकल्पावर काय म्हणाले प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट बकुल मोदी? - Union Budget 2024

ABOUT THE AUTHOR

...view details