महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रियकराला भेटण्यासाठी बनावट पासपोर्टवर सनमनं गाठलं पाकिस्तान; आता आधार कार्ड सेंटरवाल्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - FAKE PASSPORT CASE - FAKE PASSPORT CASE

Fake Passport case बनावट कागदपत्राच्या आधारे पाकिस्तानात जाऊन लग्न करणाऱ्या नगमा उर्फ सनम खान प्रकरणात जसवंत राठोडला वर्तनगर पोलिसांनी अटक केलं आहे. जसवंत राठोड याच्या आधारकार्ड सेंटरमध्ये नगमानं आधारकार्ड बनवल्याचा पोलिसांना संशय आहे.

Fake Passport case
पाकिस्तान रिटर्न नगमा प्रकरण (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 8:23 AM IST

ठाणे Fake Passport case: नगमा उर्फ सनम खान हिचं आधारकार्ड बनवणाऱ्या जसवंत राठोडला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. जसवंत राठोड याचं आधारकार्ड सेंटर असून त्यानं बनावट कागदपत्रांच्या मदतीनं नगमा उर्फ सनमचं आधारकार्ड बनवल्याचा संशय पोलिसांना आहे. शुक्रवारी जसवंतला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बनावट कागदपत्रांच्या मदतीनं पासपोर्ट तयार करुन पाकिस्तानचा दौरा करणाऱ्या नगमा विरोधात वर्तकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ती पाकिस्तानवरुन परतल्यानंतर पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चार दिवस कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिला गुरुवारी अटक केली. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला असता, तिनं ठाण्यातील पाडा नंबर ४ इथल्या डिजिटल आधार केंद्रातून आधारकार्ड अपडेट केलं असून त्यासाठी तिनं २० हजार रुपये दिल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार आज वर्तकनगर पोलिसांनी डिजिटल आधार केंद्र मालक जसवंत राठोड याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण :सनम खान उर्फ नगमा या महिलेनं बनावट पासपोर्ट तयार करुन थेट पाकिस्तान गाठल्यानं ती चर्चेत आहे. बनावट कागदपत्रांच्या मदतीनं ती पाकिस्तानात पोहोचली. एक महिना पाकिस्तानात घालवल्यानंतर ती भारतात परतली. पुन्हा पाकिस्तानला जाण्याची तयारी सनम करत होती. मात्र, त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

सनम खान ही २३ वर्षाची विवाहित महिला असून तिला दोन मुली आहेत. परंतु ती नवऱ्यापासून विभक्त राहते. सध्या ती तिच्या आईसह ठाण्यात वास्तव्यात होती. तिची सोशल माध्यमांवरुन पाकिस्तानातल्या बशीर बरोबर मैत्री झाली. ते दोघं सहा महिने एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांच्यात प्रेम झालं. त्याला भेटण्यासाठी नगमानं कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आणि तिला एक महिन्याचा व्हिसाही मिळाला. त्यानंतर तिनं दोन मुलींसह पाकिस्तान गाठलं. तिथं जावून तिनं बशीरशी लग्न केलं. तिची आई आजारी असल्यामुळे ती एक महिन्यानंतर ठाण्यात तिच्या आईजवळ आली. आता तिला पुन्हा पाकिस्तानला जायचं होतं. यावेळी मात्र, तिला ठाणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तिची चौकशी केल्यानंतर तिनं झालेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय यंत्रणा करत आहे.

हेही वाचा

  1. ‘प्रेमासाठी’ नगमा ‘सनम’ बनून एक महिना राहिली पाकिस्तानात; बनावट पासपोर्टवर केला पाकिस्तानचा दौरा... - Woman Booked For Visit Pakistan
  2. पाकिस्तानात लग्नाच्या बेडीत अडकलेल्या नगमाला ठोकल्या बेडया; दोन दिवसांची पोलीस कोठडी - Fake Passport case
  3. Fake Passport : बनावट पासपोर्ट वापरून भारतवारी करणाऱ्या नागरिकाला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details