नागपूर Devendra Fadnavis :आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गट सक्रिय आणि आक्रमक झालेला बघायला मिळतो आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देत एक तर तुम्ही राहाल किंवा मी राहील, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. त्यानंतर आज (3 ऑगस्ट) पुणे येथे झालेल्या शिवसंकल्प मेळाव्यातसुद्धा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक टीकास्त्र सोडलेलं आहे.
देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर टीका करताना (ETV Bharat Reporter) उद्धव ठाकरेंचं भाष्य नैराश्यातून :उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. उद्धव ठाकरेंचा डोक्यावरील ताबा सुटलेला आहे. ते अत्यंत निराश झाले आहेत. त्या नैराश्यातून त्या प्रकारची भाषा बोलत आहेत. यावर आपण काय उत्तर द्यावं? असं ते म्हणाले. एखादा व्यक्ती नैराश्यातून जर डोकं बिघडल्यासारखा बोलतो त्यावेळी त्याला फार उत्तर द्यायचं नसतं; पण हे भाषण करून उद्धव ठाकरे यांनी आपण 'औरंगजेब फॅन क्लब'चे आहोत हे मात्र दाखवून दिलेलं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
सचिन वाजेच्या आरोपांची चौकशी करू : सचिन वाजे यांनी अनिल देशमुख यांच्या संदर्भात केलेला खुलासा मी देखील प्रसार माध्यमांमध्येच बघितलेला आहे. मला त्यांनी पत्र पाठवलं असं देखील प्रसार माध्यमांमधूनच ऐकलं आहे. अजून मी ते पत्र पाहिलेलं नाही. मी गेले दोन दिवस नागपूरमध्ये आहे, असं काही पत्र आलं आहे का, हे सगळं बघितल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देईन. जे काही समोर येईल त्याची योग्य चौकशी करू, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
सचिन वाजेनं केला हा आरोप :माजी गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्या पीए मार्फत पैसे घेत होते, असा धक्कादायक खुलासा सचिन वाजे यांनी केला आहे. यासंदर्भात सीबीआयकडे सबळ पुरावे असून माझी नार्को चाचणी करण्यात यावी, असं देखील सचिन वाजे म्हणाले आहेत.
ही फडणवीसांची नवीन चाल - अनिल देशमुख :मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांची वस्तुस्थिती जनतेसमोर ठेवली होती. फडणवीस यांनी कशा पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुरुंगात टाकण्यासाठी तीन वर्षांपूर्वी शपथपत्र देण्याचा जो प्रस्ताव माझ्यासमोर दिला होता. ही गोष्ट जेव्हा मी महाराष्ट्रातील जनतेसमोर आणली त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी ही नवीन चाल खेळली आहे, असा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय.
सचिन वाजेवर विश्वास ठेवता येणार नाही - अनिल देशमुख :सचिन वाजेनं केलेल्या आरोपांवर बोलताना अनिल देशमुख म्हणाले, कदाचित देवेंद्र फडणीस यांना माहीत नसेल की, मुंबई उच्च न्यायालयाने सचिन वाजे यांच्याबद्दल एक निरीक्षण नोंदवलेलं होतं. सचिन वाजे गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती आहे. दोन खुनांच्या गुन्ह्यांमध्ये त्याला अटक करण्यात आली असून तुरुंगात आहे. त्याची ही पार्श्वभूमी लक्षात घेता आता त्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
हेही वाचा:
- राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; 'वर्षा' निवासस्थानी झाली बैठक, भेटीमागचं 'राज'कारण काय? - Raj Thackeray Meet CM Eknath Shinde
- कैदेतील सचिन वाजेला प्रसार माध्यमांशी बोलण्याची परवानगी कशी? वाजेच्या बंदोबस्तातील पोलिसांना निलंबित करण्याची कॉंग्रेसची मागणी - Atul Londhe On Sachin Waze
- "देवेंद्र फडणवीस यांची नवी चाल..."; हायकोर्टाचा निकाल दाखवत अनिल देशमुखांचा गंभीर आरोप - Anil Deshmukh On Sachin Waze