महाराष्ट्र

maharashtra

ईव्हीएम मशीन चोरी प्रकरण: निवडणूक आयोगाचा दणका, तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 8, 2024, 10:57 AM IST

Updated : Feb 8, 2024, 2:33 PM IST

EVM Machine Stolen : पुण्यातील सासवड इथून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणात आता निवडणूक आयोगानं मोठी कारवाई केरत तीन अधिकाऱ्यांना निलंबित केलंय.

EVM Machine Stolen
EVM Machine Stolen

पुणे EVM Machine Stolen : सासवड तहसीलदार कार्यालयातून ईएमव्ही मशीन चोरीला गेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. आता या ईएमव्ही मशीन चोरी प्रकरणात निवडणूक आयोगानं मोठी कारवाई करत पुरंदरचे तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांचं निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत.

निवडणूक आयोगाचा दणका, तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन

तिघांवर निवडणूक आयोगाची कारवाई : सासवड तहसीलदार कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरीला गेल्यानंतर घटनास्थळी जिल्हा प्रशासन तसंच जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी भेट दिली होती. संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळीची पाहणी देखील केली होती. यानंतर आता या चोरी प्रकरणात तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, पोलीस अधिकारी तानाजी बेर्डे यांना निलंबित करण्यात आलंय.

सोमवारी झाली होती ईव्हीएमची चोरी : पुरंदर तालुक्यातील सासवड इथं सोमवारी ईव्हीएम मशीन चोरीचा प्रकार समोर आला होता. यानंतर आता पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलंय. या दोघांकडून मशीन पोलिसांनी हस्तगत केल्या, आणखी एक आरोपी पकडण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. या गुन्ह्यामध्ये दिसणाऱ्या व्यतिरिक्त आणखी कोणी सामील आहे का ? याबाबतचा तपास पोलीस प्रशासनाकडून केला जातोय. सासवड तहसील कार्यालयात 40 ईव्हीएम ठेवण्यात आले होते. त्या मशिन्सपैकी एकच डेमो युनिट अज्ञात चोरट्यांनी चोरल्याचं समोर आलंय.

मतदारांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन : भारतीय निवडणूक आयोगानं देशातल्या स्थलांतरित मतदारांसाठी रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (RVM) चा नमुना विकसित केलाय. जाद्वारे एकाच बूथवरुन 72 मतदारसंघात दूरस्थ मतदान करता येते. आयोगानं गुरुवारी रिमोट व्होटिंगवर संकल्पना नोट तयार केली होती, तसंच याच्या अंमलबजावणीबाबत मतं मागवली आहेत. त्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या कायदेशीर, प्रशासकीय आणि तांत्रिक आव्हानांवर राजकीय पक्षांची मतंही मागवली होती. निवडणूक आयोगानं 16 जानेवारी, 2023 रोजी सर्व 8 मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष आणि 57 पक्षांसाठी RVM चं प्रात्यक्षिक नियोजित केलं आहे आणि त्यासाठीचं आमंत्रण लॉटला देण्यात आलंय.

हेही वाचा :

  1. तहसीलदार कार्यालयातून चोरली ईव्हीएम मशीन; पाहा सीसीटीव्ही
  2. ईव्हीएम मशीन चोरणाऱ्यांवर कारवाई होणार- मुख्य निवडणूक अधिकारी
Last Updated : Feb 8, 2024, 2:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details