अभिजीत राऊत यांची प्रतिक्रिया नांदेडBhaiyyasaheb Edke broke EVIM :नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामतीर्थ मतदान केंद्रावर एका युवकानं ईव्हीमएम मशीन छोट्या कुऱ्हाडीनं फोडलंय. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. भय्यासाहेब एडके असं ईव्हीमएम मशीन फोडणाऱ्या युवकाचं नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
रामतीर्थ येथील एका मतदान केंद्रातवर ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यानं मशीन का फोडलं याबाबत आद्याप कळू शकलं नाही. पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. - अभिजित राऊत, जिल्हाधिकारी
मतदान प्रक्रिया सुरळीत :नांदेडचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सांगितलं की, नांदेड मतदारसंघाअंतर्गत लवद-देगलूर या विभागात शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी चार ते सव्वाचारच्या सुमारास 103 क्रमांकाच्या बुथवर एका तरुणानं मशिन फोडल्याची घटना घडली. मात्र, मशिनचं कंट्रोल यूनिट सुरक्षित आहे. त्या ठिकाणी आम्ही नवीन ईव्हीएम पाठवून लगेच मतदान प्रक्रिया सुरू केलीय. ईव्हीएम मशीन फोडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं, असून त्याच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ईव्हीएम मशीनची तोडफोड :रामतीर्थ येथील प्रभाग क्रमांक तीनमध्ये सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी 4 वाजेपर्यंत 379 पैकी 185 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान सुरू असताना गावातील भैय्यासाहेब एडके (वय 25) या युवकानं कुऱ्हाड घेऊन मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम मशीनची तोडफोड केली. मी M.A. केलं असून मला नोकरी मिळत नाही, असं तो म्हणत होता. हातात कुऱ्हाड पाहून मतदान केंद्रप्रमुख सुबोध थोरातसह कर्मचाऱ्यांनी त्याला थांबण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोंधळ पाहून पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतलं. ईव्हीएम मशीन कुऱ्हाडीने फोडलं असलं तरी व्हीव्हीपीएटी मशीन काम करत असल्याचं सांगण्यात आलं. तसंच केंद्रप्रमुखांकडं असलेल्या मशिनमध्ये मतदानाचा संपूर्ण डेटा असल्यानं मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण आली नाही.
हे वाचलंत का :
- 'गादी विरुद्ध मोदी'! प्रचाराचा धुरळा, कोल्हापुरात कुणाची हवा? सोशल मीडियावर रंगलं 'वॉर' - Lok Sabha Election 2024
- भाजपाला देशाचं संविधान बदलायचंय, पण... - सुप्रिया सुळे - Supriya Sule Exclusive IV
- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राहुल द्रविड, निर्मला सीतारामन यांनी बजावला मतदानाचा हक्क - Lok Sabha Election Phase 2