शिर्डी (अहमदनगर)Deepak Kesarkar On Sambhaji Bhide:संभाजी भिडेंनी गडकिल्ले संवर्धनासाठी तरुणांमध्ये जागृती करण्याचं काम केलं आहे. त्याबद्दल आपण विचार केला पाहिजे. अधून मधून त्यांची काही वक्तव्यं येत असतात. त्यांचं वय बघून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असं वाटत असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आज (1 जुलै) शिर्डीत म्हणाले आहेत.
केसरकरांचा नागो गाणार यांना सल्ला :नागो गाणार हे चांगले आमदार आहेत. त्यांनी बोलताना विचारपूर्वक बोलावं. अतिशय पारदर्शक पध्दतीनं शिक्षकांची भरती झालेली आहे. त्यामुळे कुठेही एक जरी प्रसंग आढळला तर त्यांनी आणून दाखवावा. ताबडतोब त्यावर अॅक्शन घेण्यात येईल. पूर्वीच्या काळात ते आमदार असताना त्यावेळी शाळा मंजुरीसाठी परवानगी देताना काय प्रकार घडत होता? बदल्यांच्या संदर्भात काय प्रकार घडत होता, हे सर्वांना माहीत आहे. हे सगळं आम्ही बंद केलं आहे. शिक्षण क्षेत्र निर्मळ आहे आणि ते निर्मळ राहिलं पाहिजे. कुठेही चुकीचं वाटलं तर त्यांनी मला कळवावं. यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं शालेय शिक्षणमंत्री केसरकर म्हणाले आहेत.