मुंबई :अंमलबजावणी संचालनालयानं अहमदाबाद आणि मुंबईतील सात ठिकाणांची झाडाझडती घेतली. यावेळी अंमलबजावणी संचालनालयानं 13.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई मालेगाव प्रकरणातील नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक (नामको बँक), संबंधित आहे, अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.
ऑनलाइन बँकिंगद्वारे पाठवली रक्कम :NAMCO बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रामधील खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा संशय अंमलबजावणी संचालनालयाला होता. त्यामुळे या व्यवहारचा ईडीनं केलेल्या तपासणीत अनेक गैरव्यवहार झाल्याचं पुढं आलं, असा दावा ईडी अधिकाऱ्यांनी केला. ईडीच्या मुंबई विभागातील अधिकाऱ्यांनी हा तपास करुन हा गैरव्यवहार उघड केला. या खात्यांमध्ये शेकडो कोटींचे व्यवहार जमा झाले आहेत. मुख्यतः ऑनलाइन बँकिंगद्वारे विविध कंपन्यांना रक्कम हस्तांतरित करण्यात आली," असं ईडीकडून स्पष्ट करण्यात आलं.