महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Gelatin Explosion Satara : साताऱ्यातील परळी वन परिमंडळ कार्यालयात जिलेटिनचा भीषण स्फोट; वन विभागात खळबळ - Seized stalks of gelatin

Gelatin Explosion Satara : साताऱ्यातील परळी वन परिमंडळ कार्यालयात आज (14 मार्च) पहाटे पाचच्या सुमारास जिलेटीन कांड्यांचा भीषण स्फोट झाल्यानं खळबळ उडाली आहे. सुदैवाने या स्फोटात जीवितहानी झालेली नाही. मात्र, वन परिमंडळ कार्यालय उद्धवस्त झाले आहे.

Gelatin Explosion Satara
वन विभागात खळबळ

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 14, 2024, 4:52 PM IST

साताराGelatin Explosion Satara:जिल्ह्याच्या पश्चिमेकडील परळी खोरे गुरुवारी पहाटे भीषण स्फोटाने हादरले. उरमोडी धरण परिसरातील परळी येथील वन परिमंडळ कार्यालयातच हा स्फोट झाला आहे. स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की, संपूर्ण कार्यालयच उद्ध्वस्त झाले. दारे, खिडक्या आणि पत्रे उडून जाऊन दूरवर पडले. सुदैवाने कार्यालयात कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली. या घटनेनंतर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जिलेटीन कांड्यांमुळे हा स्फोट झाल्याची चर्चा आहे.

स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला :यासंदर्भात सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार परळी (ता. सातारा) येथील वन परिमंडल कार्यालयाच्या स्टोअर रूममध्ये गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटाचा आवाज एवढा जोरात होता की, संपूर्ण परिसरातील लोक जागे झाले. नागरिकांनी वनपरिमंडल कार्यालयाकडे धाव घेतली. त्यावेळी कार्यालयामध्ये कोणीच उपस्थित नव्हते. नागरिकांनी या घटनेची माहिती परळीच्या वन परिमंडल अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.


जप्त मुद्देमालातील जिलेटीनचा स्फोट? :या भीषण स्फोटात वन कार्यालयाच्या इमारतीचे पत्रे, दारे, खिडक्या उडून काही अंतरावर जाऊन पडल्या. कार्यालयातील स्टोअर रूममध्ये दोन मोटारसायकली, आग विझवण्याच्या मशीन आणि कागदपत्रे होती. हा जिलेटिन सदृश्य वस्तूचा स्फोट असावा, असं स्फोटाच्या तीव्रतेवरून स्पष्ट होत आहे. वन विभागाने कारवाई करून जप्त केलेल्या मुद्देमालातील जिलेटीन कांड्यांचा स्फोट झालाय का? यासंदर्भात आता तपास केला जात आहे.

जिलेटिनचा स्फोट करून एटीएम फोडले : जिलेटिनच्या कांड्यांचा वापर स्फोट घडविण्यासाठी होतो. याचा प्रयोग चोरट्यांनी केल्याची घटना 6 डिसेंबर, 2021 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील समनापूर येथे घडली होती. यामध्ये चोरट्यांनी एटीएम फोडून चार लाखांहून अधिक रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. जिलेटिनचा स्फोट करून हे एटीएम फोडल्यानं एटीएमचे अक्षरशः तुकडे झालेले होते. या घटनेनी तालुक्यात खळबळ उडाली होती.

हेही वाचा :

  1. Rahul Gandhi News: उद्योगपतींची १६ लाख कोटींची कर्जमाफी म्हणजे २४ वर्षांची मनरेगा योजना-राहुल गांधी
  2. Man Reunited With Mother : भाऊच झाले मनोरुग्ण भावाचे वैरी, मग 'पोटच्या गोळ्या'ला मिळाली जन्मदात्या 'आईची माया'
  3. Leopard Skin Smuggling: बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारी टोळी गजाआड, धक्कादायक माहिती आली समोर

ABOUT THE AUTHOR

...view details