मुंबईDrug Smuggler Arrested : नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनं (एनसीबी) मुंबईतील सायन सर्कल येथून दहा कोटींचं पाच किलो एमडी ड्रग्स जप्त केलं आहे. एम एस शेख या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आरोपीला सायन सर्कल येथून अटक देखील करण्यात आली असल्याची माहिती एनसीबी मुंबईचे अतिरिक्त संचालक अमित घवाटे यांनी दिली आहे.
5 किलो मेफेड्रोन जप्त :NCB मुंबईनं अचूक कारवाई करत 5 किलो मेफेड्रोन म्हणजेच एमडी जप्त केलं आहे. मेफेड्रोन अमली पदार्थाच्या आंतरराज्य अवैध तस्करीमध्ये सामील असलेल्या नेटवर्कच्या विश्वासार्ह गुप्त माहितीच्या आधारे आणि अवैध अमली पदार्थांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी NCB मुंबईने अंधेरी येथील रहिवासी एम एस शेख याला सापळा रचून पकडण्यासाठी सायन सर्कलजवळ पाळत ठेवली आहे. आंतरराज्य तस्कर असलेल्या एम एस शेख याला NCBच्या व्यापक प्रयत्नांमुळे अटक करण्यात यश आलं आहे आणि त्याच्याकडून दहा कोटी रुपयांचं 5 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आलं. हे अमली पदार्थ हैदराबाद येथून आणले गेले होते आणि आरोपीनं हे ड्रग्ज मुंबई परिसरात वितरीत करण्यासाठी आणलं होतं, असं तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.