महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

DRI Seized Cocaine: 'डीआरआय'कडून फिल्मी स्टाईलनं आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; 100 कोटींचं कोकेन जप्त - DRI Seized Cocaine

DRI Seized Cocaine worth 100 Crore : डीआरआयच्या पथकानं मोठी कारवाई करत सुमारे 100 कोटींचं कोकेन जप्त केलंय. याप्रकरणी दोन विदेशी महिला प्रवाशांसह चौघांना अटक करण्यात आलीय. यावेळी कारवाई करताना झालेल्या झटापटीत अधिकारी व आरोपी जखमी झाले आहेत.

DRI Seized Cocaine: आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा 'डीआरआय'कडून पर्दाफाश; 100 कोटींचं कोकेन जप्त
DRI Seized Cocaine: आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा 'डीआरआय'कडून पर्दाफाश; 100 कोटींचं कोकेन जप्त

By PTI

Published : Mar 20, 2024, 8:25 AM IST

मुंबई DRI Seized Cocaine worth 100 Crore : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई प्रादेशिक युनिटनं मंगळवारी दोन परदेशी महिला प्रवाशांकडून 9.8 किलो कोकेन जप्त करुन आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेटचा पर्दाफाश केलाय. या कोकेनची किंमत तब्बल 100 कोटी रुपये आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबा येथून छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आल्यानंतर दोन महिला प्रवाशांना अटक करण्यात आल्याचं डीआरआयनं म्हटलंय. यापैकी एक थायलंड आणि एक इंडोनेशियाची महिला आहे.

तब्बल 100 कोटींचं कोकेन जप्त :याप्रकरणी एका अधिकाऱ्याने सांगितलं की, विमानतळावर दोघांकडून एकूण 9.82 किलो कोकेन जप्त करण्यात आलंय. त्याचे बाजारमूल्य 100 कोटी रुपये आहे. हे कोकेन दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरातील एका टोळीला पोहोचविले जाणार होते, अशी माहिती महिलांनी अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सांगितलीय. डीआरआयची टीम मुंबईत पाळत ठेवण्यासाठी तैनात करण्यात आली होती. सिंडिकेटच्या इतर सदस्यांना पकडण्यासाठी दुसरी टीम दिल्लीला पाठवण्यात आली होती.

ड्रग्ज तस्करी सिंडिकेटच्या सदस्यांना अटक :डीआरआय अधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीनं ग्रेटर नोएडामध्ये सापळा रचला. त्यांनी गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला ओळखले. पण सूत्रधाराला आपल्यासा पकडायला पथक आल्याची जाणीव होताच त्यानं अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. त्यानं तिथून पळ काढला. डीआरआयच्या पथकानं नायजेरियन नागरिक आणि त्याच्या साथीदाराचा पाठलाग करुन त्यांना पकडलं. दोन्ही आरोपी आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करी सिंडिकेटचे सदस्य आहेत. पाठलाग करताना अधिकारी तसंच आरोपी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. याप्रकरणी डीआरआयनं नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, 1985 अंतर्गत दोन महिला प्रवाशांना अटक केलीय.

हेही वाचा :

  1. डीआरआयची मोठी कारवाई; शरीरात लपवून आणल्या कोकेनच्या 'इतक्या' कॅप्सूल, व्हेनेझुएलाच्या प्रवाशाला ठोकल्या बेड्या
  2. साकीनाका पोलिसांची धडक कारवाई, 9 कोटींचं ड्रग्ज जप्त, दोन नायजेरियन अटकेत
  3. Mumbai Crime News : धक्कादायक! 6 कोटीचे अमली पदार्थ आणले सॅनिटरी नॅपकीनमध्ये लपवून; युगांडाच्या दोन महिलांना अटक
  4. Lalit Patil Drugs Case : ललित पाटीलचे मराठवाडा कनेक्शन; कच्चा माल घेण्यासाठी पसरले जाळे, ससूनमधून पळाल्यावर थांबला संभाजीनगरात?

ABOUT THE AUTHOR

...view details