महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोलीत; कुख्यात नक्षली कमांडर तारक्काचं साथिदारांसह आत्मसमर्पण - DEVENDRA FADNAVIS VISIT GADCHIROLI

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाची सुरुवात नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून केली. त्यांच्या उपस्थितीत आज कुख्यात नक्षलवादी कमांडर तारक्का आणि तिच्या साथिदारांनी आत्मसमर्पण केलं.

Devendra Fadnavis Visit Gadchiroli
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2025, 5:53 PM IST

Updated : Jan 1, 2025, 7:50 PM IST

गडचिरोली :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीतील शेवटची पोस्ट असलेल्या पेनगुंडा इथं भेट दिली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस मुख्यालयात कुख्यात नक्षलवादी कमांडर तारक्का उर्फ तारा उर्फ वत्सला उर्फ विमला सिडाम हिच्यासह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नक्षलवाद्यांचं योग्य प्रकारे पनर्वसन करण्यात येईल, असं आश्वासन दिलं. यावेळी पेनगुंडा इथं बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की "गडचिरोलीत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी ही विकासाची नवी पहाट फुलली आहे. या विकासाच्या वाटेत सगळ्यांनी संवैधानिक मार्गानं सहभागी होऊन शांतता नांदण्यासाठी प्रयत्न करू. तारक्कासह आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचं योग्य पुनर्वसन करुन त्यांना आत्मसन्मानानं जगण्याची संधी उपलब्ध करुन देऊ."

कुख्यात नक्षली कमांडर तारक्काचं आत्मसमर्पण (Reporter)

गडचिरोलीच्या विकासात नवी पहाट :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज कुख्यात नक्षलवादी कमांडर तारक्का उर्फ तारा उर्फ वत्सला उर्फ विमला सिडाम हिच्यासह अनेक जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करुन त्यांचं योग्य पुनर्वसन करण्याचं आश्वासन देण्यात आलं. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की "तारक्कासह अनेक जहाल नक्षलवादी त्यांचा मार्ग भटकले होते. मात्र आता त्यांनी आत्मसमर्पण करुन योग्य मार्ग पत्करला आहे. त्यांना आत्मसन्मानं जगण्यासाठी योग्य ती संधी उपलब्ध करुन देण्यात येईल. गडचिरोलीत आता विकासाची नवी पहाट उगवली आहे. त्यामुळे इतरही रस्ता भटकेल्या नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येऊन आत्मसन्मानं जगावं," असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

कुख्यात नक्षली कमांडर तारक्काचं साथिदारांसह आत्मसमर्पण (Reporter)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन वर्षाची सुरुवात गडचिरोलीतून :नवीन वर्षाची सुरुवात अनेकजण विविध पर्यटनस्थळ किवा देवस्थानाला भेट देऊन करतात. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या समजल्या जाणाऱ्या पेनगुंडा या पोस्टवर धडकले. या ठिकाणी जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 24 तासात उभारलेल्या पेनगुंडा पोलीस मदत केंद्रात त्यांनी भेट दिली. या भेटीत कुख्यात नक्षलवादी तारक्का आणि तिच्या साथिदारांनी आत्मसमर्पण केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांचं मनोधैर्य उंचावलं.

हेही वाचा :

  1. नक्षलग्रस्त पेनगुंडा येथे अवघ्या २४ तासांत उभारले पोलीस मदत केंद्र
  2. निवडणुकीपूर्वी सुरक्षा दलाची गडचिरोलीत मोठी कारवाई; चकमकीत पाच नक्षलवादी ठार
  3. पोलिसांचा खबऱ्या असल्याचा संशय; गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून तरुणाची हत्या - Gadchiroli Naxal
Last Updated : Jan 1, 2025, 7:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details