मुंबईDevendra Fadnavis :मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाच्या वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेचं आज (11 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण कोस्टल रोडच्या इतिहासाची माहिती सांगत तत्कालीन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर निशाणा साधला आहे. यात कोणी खोडा घातला? कोणी कमिशन खाल्ले? कोणी वसुली केली? म्हणून सत्य हे सांगावचं लागतं. नाहीतर खोटं लोकांना खरं वाटू लागतं. म्हणून आज मी हे सत्य सांगितलं, असं ते म्हणालं. मुंबईत या कोस्टल रोडच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
उद्यान व्यतिरिक्त एकही बांधकाम नाही :याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आज मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कोस्टल रोडची एक लेन आज आपण सुरू केली आहे. लवकरच दुसरी लेन सुरू केली जाईल. आता एक लेन जरी सुरू करत असलो तरीसुद्धा यामुळे मुंबईकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे. कारण आता एक लेनचं काम पूर्ण झालं आहे आणि दुसऱ्या लेनचं काम सुरू आहे. लवकरच ते पूर्ण होईल."
दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेत नाही :देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाले की, उबाठा गटाचे आदित्य ठाकरे म्हणतात की, हे सर्व काम आम्ही केलं आणि याचं श्रेय महायुती घेत आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, आम्ही दुसऱ्याच्या कामाची श्रेयं घेणारे लोक नाही. आम्ही जी कामं करतो त्याचं श्रेय आम्ही घेतो. या कोस्टल रोडची संकल्पना ही नवीन नसून वर्षांपासूनची होती. उद्धव ठाकरे यांनी तर कोस्टल रोडच्या प्रेझेंटेशनवर (Coastal Road Presentation) मागच्या दोन निवडणुका लढल्या; परंतु कोस्टल रोड कधी झालाच नाही. कोस्टल रोड बांधण्याची सर्वांत मोठी समस्या म्हणजे नियमांमध्ये सी लिंक बांधण्याला परवानगी आहे; परंतु कोस्टल रोड बांधायला परवानगी नव्हती. कारण कोस्टल रोड बांधण्याकरता रिक्लेमेशन करावं लागतं आणि रिक्लेमेशन केलं तर सीआरझेडची लाईन बदलेल. म्हणून रिक्लेमेशन करू देणार नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका होती.