मुंबई Majhi Ladki Bahin Yojana : राज्याच्या विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं राज्य सरकारनं माझी लाडकी बहीण योजना सुरू कल्याचा आरोप विरोधक करत आहेत. सध्या संपूर्ण राज्यात या योजनेची चर्चा सुरू आहे. दुसरीकडं याच योजनेतील विविध तरतुदींवरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका होताना दिसत आहे. या योजनेमुळं महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, याच योजनेवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. झारखंडमधील इंडिया आघाडीचं सरकार आमच्या योजनेची कॉपी करत असल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे.
काय म्हणाले अजित पवार? :उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी 'X' सोशल मीडियावर पोस्ट करत विरोधकांवर टीका केली आहे. "झारखंडमधील इंडिया आघाडी सरकारनं लाडकी बहीण योजनेची नक्कल केल्याचं स्पष्ट झालंय. महसुलाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य भारतातील अव्वल राज्यांपैकी एक आहे. आम्ही ही योजना दीर्घकाळ राबवू. पण, झारखंडमध्ये ही योजना प्रभावीपणे कशी राबवायची यामुळं इंडिया आघाडी चिंतेत आहे."
- विरोधकांमध्ये भीतीचं वातावरण : " महाविकास आघाडीचे सर्व नेते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर तुटून पडलेत. दुसरीकडं झारखंडमध्ये ही योजना राबवित आहे. याचा अर्थ या योजनेची गुणवत्ता किती आहे, हे आपण बघावं. विरोधकही या योजनेची कॉपी करत आहेत," असा टोला शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी विरोधकांना लगावला.