महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई पदवीधर निवडणूक लढवण्यावर डॉ. दीपक सावंत ठाम; तर भाजपाच्या वतीनं किरण शेलार रिंगणात - Graduate Constituency Election - GRADUATE CONSTITUENCY ELECTION

Graduate Constituency Election : विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदार संघातल्या उमेदवारीबाबत आता महायुतीत पुन्हा एकदा विसंवाद असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार डॉ. दीपक सावंत (Deepak Sawant) यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं असलं तरी, भाजपाच्या वतीनं किरण शेलार (Kiran Shelar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.

Graduate Constituency Election
मुंबई पदवीधर निवडणूक (ETV BHARAT MH DESK)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 8:04 PM IST

मुंबई Graduate Constituency Election : मुंबई पदवीधर मतदार संघातून महायुतीच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किरण शेलार (Kiran Shelar) यांची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने नुकतीच जाहीर केलीय. मात्र, या मतदारसंघातून आपण गेली अनेक वर्ष काम करीत असून या मतदारसंघातून आपण सातत्यानं विजयी होत आलो आहोत. यावेळी सुद्धा आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असल्याचं आपण मुख्यमंत्र्यांना कळवलं आहे. तसेच आपण उमेदवारी अर्ज सुद्धा भरून तयार आहोत अशी माहिती, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत (Deepak Sawant) यांनी दिलीय.

प्रतिक्रिया देताना डॉ. दीपक सावंत (ETV BHARAT Reporter)



मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर निर्णय मान्य: या मतदारसंघातून आपले काम असून आपण आतापर्यंत अनेक मतदार तयार केले आहेत. आपल्याकडं मतदारांची संख्या अधिक आहे. कुणाचे किती मतदार आहेत हे शेवटी आकडेवारीवरून लक्षात येईलच, मात्र या मतदारसंघावर आपली पकड असून पदवीधर कोणाला कौल देतात हे महत्त्वाचं आहे. या मतदारसंघातील उमेदवारीबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लवकरच भेट घेणार आहोत. याबाबत मुख्यमंत्री वरिष्ठ पातळीवर बोलून जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल. मात्र सध्यातरी आपण निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत असं डॉ. सावंत यांनी स्पष्ट केलंय.



विरोधी उमेदवाराची चिंता नाही: मुंबई पदवीधर मतदार संघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून ॲड. अनिल परब यांना उमेदवारी देण्यात आलीय. मात्र आपल्यासमोर कोणता उमेदवार आहे याने आपल्याला काहीच फरक पडत नाही, या निवडणुकीत रणनीतीने जो लढतो तो जिंकतो आणि ही सुसंस्कृत अशी निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीत आपला विजय निश्चित होईल असेही सावंत यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा -

  1. पदवीधर निवडणुकीसाठी मनसे विरुद्ध भाजपात 'सामना'; अभिजित पानसे Vs निरंजन डावखरेंमध्ये 'टाईट फाईट'
  2. Amravati Graduate Election : कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर यश नक्की मिळेल - रणजित पाटील
  3. Graduate Constituency Election : पदवीधर मतदारसंघ निवडणूक; अशी आहे मत नोंदवण्याची प्रक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details