महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डेक्कन क्वीनचा 95 वा वाढदिवस; मात्र यंदा प्रवाशांविनाच साजरा झाला कार्यक्रम - Deccan Queen Birthday

Deccan Queen Birthday : पुणे-मुंबई शहराला जोडण्यासाठी 1 जून 1930 रोजी सुरु झालेल्या डेक्कन क्वीनला 94 वर्षे पूर्ण झाली असून तिनं आता 95 व्या वर्षात प्रदार्पण केलंय. मात्र, डेक्कन क्वीनचा यंदाचा वाढदिवस प्रवाशांविनाच साजरा करण्यात आला.

Deccan Queen 95th Birthday
डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा (Source reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 1, 2024, 11:03 AM IST

पुणे Deccan Queen Birthday :मुंबई आणि पुणे या देशातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी दख्खनची राणी अर्थात डेक्कन क्वीनला आज (1 जून) 94 वर्षे पूर्ण झाली असून तिनं आता 95 व्या वर्षात प्रदार्पण केलंय. पुणे-मुंबई-पुणे असा दररोज प्रवास करणारे प्रवासी केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस दरवर्षी साजरा करतात. मात्र, यंदा मुंबईत सुरू असलेल्या मेगाब्लॉकमुळं प्रवाशांचा हिरमोड झालाय. त्यामुळं यंदा डेक्कन क्वीन वाढदिवस प्रवाशांविनाच साजरा करण्यात आला. दरवर्षी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आणि प्रवाशांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणारा डेक्कन क्वीन चा वाढदिवस आज प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर साजरा करण्यात आला.

डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा (Source reporter)

यंदा 70 वे वर्ष :रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा या गेल्या 70 वर्षांपासून केक कापून डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करतात. हर्षा शहा यांचे काका शांतिलाल शहा व्यावसायानिमित्त पुणे-मुंबई असा नियमित प्रवास करत होते. त्यांनी 1954 मध्ये पहिल्यांदा डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी हर्षा शहा या केवळ पाच वर्षांच्या होत्या. तेव्हापासून दरवर्षी त्या डेक्कन क्वीनच्या वाढदिवसात सहभागी होत आहेत. काकांच्या पश्चात त्यांनी स्वत: डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा सुरू ठेवली.


मेगाब्लॉकमुळं डेक्कन क्वीनची सेवा खंडित : मध्य रेल्वेवरील सीएसएमटीवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 10 आणि 11 चं विस्तारीकरण करून 24 डब्यांची रेल्वेगाडी उभी करण्यासाठी पायाभूत कामं सुरू आहेत. त्यासाठी आज (1 जून) रात्री 12:30 वाजल्यापासून ते 2 जून रोजी दुपारी 12:30 वाजेपर्यंत 36 तासांचा ब्लाॅक घेण्यात आलाय. यात डेक्कन क्वीनची सेवाही खंडित केली आहे.

हेही वाचा -

  1. तब्बल 20 मिनिटे रोखली डेक्कन क्वीन; लोणावळ्यात स्थानिकांकडून रेल रोको आंदोलन
  2. मुंबईला जाताय तर थांबा! 'ही' बातमी न वाचता मुंबईला जाण्याचं नियोजन केल्यास होऊ शकते अडचण - Mega Block
  3. मुंबईकरांचे 'मेगा'हाल; गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं मध्य रेल्वेचं आवाहन - Central Railway Jumbo Mega Block

ABOUT THE AUTHOR

...view details