मुंबई Ajit Pawar On Poonam Pandey Death : आपल्या अभिनयापेक्षा वादग्रस्त हरकतींनी चर्चेत असलेली अभिनेत्री पूनम पांडे हिनं आपल्या मृत्यूची अफवा पसरवल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शनिवारी सोलापूर दौऱ्यातील भाषणात पूनम पांडेच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं. अजित पवारांकडून 'गलती से मिस्टेक' झाली. पूनम पांडेच्या मृत्यूबाबत खुद्द पूनम पांडेनं समोर येऊन जिवंत असल्याचा खुलासा केला. त्यानंतर मात्र अजित पवार यांनी पूनम पांडेच्या मृत्यूबाबत बोलून स्वतःचा अज्ञानपणा दाखवला, असे टीकास्त्र विरोधकांनी सोशल मीडियावर सोडले आहे.
सोलापुरातील कार्यक्रमात महिलांना सल्ला :शनिवारी दुपारी सोलापूर शहरातील महानगरपालिका आरोग्य केंद्रात महिला सर्वरोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. महिलांच्या आजाराबाबत बोलताना अजित पवारांनी पूनम पांडेच्या मृत्यूबाबत उल्लेख केला. महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा त्यांनी यावेळी सल्ला दिला.
फेक बातमी वाचली आणि भाषणात बोलून दाखवली :उपमुख्यमंत्री अजित पवार पुढं बोलताना असंही म्हणाले, मी आज सकाळीच बातमी वाचली आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा महिलांच्या आजरापणामुळं मृत्यू झाला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांनी अजित पवारांना पूनम पांडेच्या मृत्यूबाबत खरी माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार घाईगडबडीत निघून गेले. अजित पवार राष्ट्रवादीचे स्थानिक नेते किसन जाधव यांच्या घरी ताबडतोब स्नेहभोजनासाठी गेले. सोबत रुपाली चाकणकर याही होत्या. माध्यमांनी रुपाली चाकणकर यांच्या लक्षात आणून दिल्यावर कीसन जाधव यांच्या घरी स्नेहभोजन करताना पूनम पांडेच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. पूनम पांडे या अजून हयात आहेत, असं रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांना सांगितलं.
सुप्रिया सुळेंना उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही :सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठक घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नियोजन भवनात पत्रकार परिषद घेतली. सोलापुरातील स्थानिक पातळीवर असलेल्या सर्व परिस्थितीचा आढावा घेत माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था याबाबत माहिती देताना, महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड यांच्यात झालेल्या गोळीबाराविषयी अजित पवारांनी चुकीची घटना घडली आहे, अशी माहिती दिली. "पोलीस कायदेशीर प्रक्रिया पार पाडतील, योग्य ती कारवाई करतील," असं त्यांनी यावेळी सांगितलं. सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री फडणवीसांचा राजीनामा मागितला आहे. त्यावर उत्तर देताना "सुप्रिया सुळेंच्या प्रतिक्रियेला उत्तर देण्यास मी बांधील नाही," असं अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.
पूनम पांडेच्या मृत्यू बाबत उल्लेख :प्रसिद्ध अभिनेत्री पूनम पांडेच्या मृत्यूची अफवा होती. याबाबत अनेकांनी पूनम पांडेच्या मृत्यूबाबत सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं होतं. मात्र अचानक पूनम पांडेनं स्वतः माध्यमांसमोर जिवंत असल्याची माहिती दिल्यानं आश्चर्याचा धक्काच बसला. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पूनम पांडेच्या निधनाची माहिती घेतली होती. मात्र अभिनेत्री पांडे जिवंत असल्याची माहिती अजित पवारांना नसल्यानं त्यांनी भर सभेत दुःख व्यक्त केलं. अफवेवर विश्वास ठेवून अजित पवारांनी भाषणात पूनम पांडेच्या मृत्यू बाबत उल्लेख केला.
सत्यजित तांबेंनी केली कारवाईची मागणी :वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडेनं आपल्या निधनाची सोशल माध्यमांवर थाप मारुन हा जाहीरातीचा भाग होता, असं स्पष्ट केलं. मात्र त्यामुळं अनेकांची फसगत झाली. पूनम पांडेनं मारलेल्या या निधनाच्या थापेबाबत आता चित्रपटसृष्टीतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सत्यजित तांबे यांनीही मुंबई पोलिसांना ट्विट करत एक्सवर पोस्ट केली आहे. पूनम पांडेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे.
हेही वाचा :
- 'पार्थ पवार गजानन मारणे भेट चुकीची, पार्थची भेट झाल्यावर समजावून सांगेन': अजित पवारांनी टोचले कान
- संजय राऊत यांच्या टीकेला अजित पवारांचा पलटवार, 'विनाशकाले विपरीत बुद्धी' म्हणत केला हल्लाबोल