महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मायक्रोसॉफ्ट सेवा कशामुळं झाली प्रभावित, सायबर तज्ञ म्हणाले,... - Microsoft Outage Sparks - MICROSOFT OUTAGE SPARKS

Microsoft Outage Sparks : मायक्रोसॉफ्टच्या सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे काही अंशी अनेक सेवा प्रभावित झाल्या होत्या. नेमकी काय अडचण निर्माण झाली, यासंदर्भात सायबर तज्ञांनी आपलं मत व्यक्त केलंय.

Microsoft Outage Sparks
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 10:51 PM IST

नागपूर Microsoft Outage Sparks : मायक्रोसॉफ्टच्या सायबर सुरक्षा प्लॅटफॉर्ममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे काही अंशी अनेक सेवा प्रभावित झाल्या होत्या. आता हळूहळू सर्व सेवा पूर्वपदावर येऊ लागल्या आहे. नेमकी काय अडचण निर्माण झाली, यासंदर्भात सायबर तज्ञांना काय वाटतं हे जाणून घेणार आहोत.

सायबर तज्ञ श्रीकांत अर्धापुरकर (ETV Bharat Reporter)

कशामुळं झाल्या सेवा प्रभावित : मायक्रोसॉफ्ट सिस्टम हे एक तांत्रिक सिस्टम आहे. मायक्रोसॉफ्टचं डेव्हलपमेंट हे सब कंपनीमार्फत बनवून घेतलं जातं. क्राउड साईड नावाची कंपनी मायक्रोसॉफ्टची सायबर सेक्युरिटीची जबाबदारी पार पाडते. सायबर अटॅकला कंट्रोल करण्याचं काम क्राउड साईड करत असते. आज क्राउड साईटचा अपडेट आला. मात्र, त्या अपडेटला सिस्टम सपोर्ट करु शकलं नाही, त्यामुळं सगळे सिस्टम ब्ल्यू स्क्रीन ऑफ डेथ मध्ये कन्वर्ट झाले. हा त्याचा इम्पॅक्ट होता, असं सायबर तज्ञ श्रीकांत अर्धापुरकर यांनी सांगितलं आहे. बऱ्याच सोर्सेसकडून एक छोटा प्रोग्राम रिलीज झाला आहे. त्या प्रोग्राममध्ये अपडेटेड फाईल रिमुव्ह केली, तर तो प्रॉब्लेम ताबडतोब दुरुस्त होईल, असं देखील ते म्हणाले आहेत.

ग्लोबल हॅकिंगचा प्रकार असू शकतो : एवढी मोठी घटना घडल्यानं यात घातपात ग्लोबल हॅकिंग असू शकतं, सध्याची परिस्थिती पाहता या अगोदर देखील हॅकर्सनी सर्व्हर ठप्प केले आहेत. त्यामुळं असा अटॅक होऊ शकतो, मात्र हॅकिंग झालं असं कोणती ही कंपनी जबाबदारी घेणार नाही. परंतु हॅकिंगची शक्यता नाकारता येत नाही. मायक्रोसॉफ्टची सिस्टम क्रिटिकल सेवेत वापरली जातात. या सेवेमध्ये हॉस्पिटल, बँक, विमानसेवा आणि पूर परिस्थिती पाहता डॅमची यंत्रणा देखील मायक्रोसॉफ्ट कनेक्ट असल्याचं सायबर तज्ञ श्रीकांत अर्धापुरकर म्हणाले.


जगभरातील व्यवहार ठप्प : मायक्रोसॉफ्ट सर्व्हरमधील बिघाडामुळे जगभरातील संगणकीय व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. यामुळे विमानसेवा देखील विस्कळीत झाली. मायक्रोसॉफ्टचा वापर करणाऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारतातील स्पाइसजेटने ट्विटरवर पोस्ट केलं की, ते त्यांच्या सेवा देताना अडचणींना सामोरे जात आहेत. यामुळे ग्राहकांना मिळणाऱ्या बुकिंग, चेक-इन आणि ऑनलाइन सेवांवर परिणाम होत आहे.

हेही वाचा :

  1. "प्रवाशांना सुविधा पुरवण्याच्या विमान कंपन्यांना सूचना, लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल" - Microsoft Outage Sparks
  2. मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन; जगभरातील बँक-विमानसेवा विस्कळीत, मुंबईतही अनेक विमाने खोळंबली - Microsoft Windows Crash

ABOUT THE AUTHOR

...view details