पुणे Controversial IAS Officer : परिविक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पूजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्याचं केबिन बळकावल्यानं पूजा खेडकर या चर्चेत आल्या होत्या. त्यासह त्यांनी खासगी गाडीवर लाल दिवा लावल्यानं मोठी खळबळ उडाली. अखेर वाद वाढल्यानं परिविक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम इथं बदली करण्यात आली. वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिलं, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते.
गाडीवर लाल दिवा आणि लिहिलं महाराष्ट्र शासन :आयएएस असलेल्या डॉ. पूजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते. पुण्यात आल्यावर पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी गाडीवर लाल दिवा, तसेच खासगी गाडीवर महाराष्ट्र शासन लिहून ती फिरवणं तसेच जिल्हाधिकारी कार्यालय इथं ती गाडी थाटात थांबवणं एवढंच नव्हे, तर वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर देखील बळकवल्याचं आरोप पूजा खेडकर यांच्यावर होता. याबाबत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडं पत्र लिहित अहवाल सादर केला आहे. म्हणून आता या थाटामाटात राहणाऱ्या परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची बदली करण्यात आली आहे.