महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळासाहेबांचा वारसा सांगायला मनगटात जोर असावा लागतो- मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

CM Eknath Shinde: ''शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना 'मातोश्री' हे अखंड राज्यातील शिवसैनिकांसाठी मंदिर होतं. मात्र आता 'मातोश्री' उदास हवेली झाली आहे. शिवसेनाप्रमुखांचा वारसा सांगणाऱ्यांनी आता आरसा पाहण्याची गरज आहे'', असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला. कोल्हापुरात दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे आज (17 फेब्रुवारी) बोलत होते.

CM Eknath Shinde taunts Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 9:00 PM IST

Updated : Feb 17, 2024, 11:00 PM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर टीका करताना

कोल्हापूर CM Eknath Shinde :मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, ''नेहमी सत्याचा विजय होतो. यामुळेच आपल्याला शिवसेना आणि पक्षाचं चिन्ह मिळालं आहे. अधिवेशनासाठी जमलेल्या गर्दीमुळे शिवसेना कोणाची आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आज अनेक जण शिवसेनेत येत आहेत. मात्र त्यांना गद्दार ठरवलं जात आहे. यामुळेच तुम्ही एक दिवस कचऱ्यात जाणार हे नक्की असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. "शिवसेनेचे हिंदुत्व सर्वव्यापी आहे. आज तुमची जीभ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायला का झडते आहे?'', असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती:'' शिवसेनेचं खच्चीकरण होत असल्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं. म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना छातीवर दगड ठेवावा लागला. आम्ही कट्टर बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक होतो. मात्र मला शिवसेना वाचवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी हे पाऊल उचलावं लागलं. आज जनता आमच्यासोबत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला चांगले पाठबळ देण्याचं काम राज्यातील जनतेनं केलं. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पहिला निर्णय शेतकऱ्यांसाठीच घेतला. दुष्काळी भागात शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे, असा दुसरा निर्णय आम्ही घेतला. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे,'' असं मुख्यमंत्री म्हणाले.

तुम्हाला लाज वाटायला हवी होती:''शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर एक पत्र आलं. या पत्रातून पन्नास कोटी मिळावेत, अशी मागणी करण्यात आली. 50 खोक्यांचे आरोप आमच्यावर करण्यात आले. मात्र 50 कोटी रुपये मागताना जनाची नाही तर मनाची लाज वाटायला हवी होती'', अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. ''2019 च्या निवडणुकीत तुम्ही शिवसेना-भाजपा युती बरोबर लढलात. त्यांच्यासोबत तुम्ही सरकार स्थापन करायला हवं होतं. मात्र तुम्ही युती धर्म पाळला नाही. 2019 च्या निवडणुकीत तुम्ही लग्न एकाबरोबर आणि संसार दुसऱ्याबरोबर केला तर हनिमून तिसऱ्या रोबर केल्याचा'' घणाघात मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर केला.

''राज्यात आज काही जण माझा बाप सोडला म्हणून टाहो फोडत आहेत. मात्र वारसा सांगणाऱ्यांनी स्वतः पहिला आरसा पाहावा. स्वतःची कर्तृत्व दाखवावीत, कर्तृत्व असेल तर लपून राहत नाही. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेबांचा वारसा सांगायला मनगटात जोर असावा लागतो. शिवसेनेला वाढवण्यासाठी अनेक शिवसैनिकांनी योगदान दिलं. तुम्ही तर आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे आहात. त्या रेघोट्याही तुम्हाला नीट मारता येत नाहीत.'' -- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात राज ठाकरे, नारायण राणेंचा उल्लेख:''मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पक्षाकडे काय मागितलं होतं? त्यांनाही स्वार्थापोटी यांनी पक्षाबाहेर काढलं. दोन-चार टकल्यांना सोबत घेऊन पक्ष मोठा होत नाही. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडला मायनिंग कारखाना सुरू करताना नक्षलवाद्यांच्या अनेक धमक्या आल्या. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी सुरक्षा घ्या, म्हणून विनंती केली. मात्र मला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुरक्षा देखील दिली नाही. मग मला नक्षलवाद्यांकडून मारण्याचा तुमचा डाव होता का?'', असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा:

  1. नकुल नाथ यांनी सोशल मीडियातून हटविलं काँग्रेसचं नाव, कमलनाथ यांनी ही' दिली प्रतिक्रिया
  2. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना मागायचा तांदळाची लाच; वीज कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
  3. अँटलिया स्फोटकातील आरोपी सचिन वाझेला तुरुंगातून लिहायचयं पुस्तक, न्यायालयानं लॅपटॉप देण्याची फेटाळली मागणी
Last Updated : Feb 17, 2024, 11:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details