महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुख्यमंत्री दोन दिवसासांठी मूळ गावी, गावकऱ्यांकडून जंगी स्वागत; दौऱ्याचं कारण काय? - ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा

CM Eknath Shinde in Satara : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी आपल्या मूळ गावी पोहोचले आहेत. यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं.

CM Eknath Shinde in Satara
CM Eknath Shinde in Satara

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 8:00 AM IST

Updated : Jan 24, 2024, 11:47 AM IST

सातारा CM Eknath Shinde in Satara : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या गावच्या यात्रेसाठी दोन दिवसांच्या महाबळेश्वर दौऱ्यावर गेले आहेत. यात्रेसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांचं ग्रामस्थांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केलं. याठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसभादेखील घेणार आहेत.


ग्रामस्थांकडून मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत : महाबळेश्वर तालुक्यातील दरे, तांब, उचाट आदींसह पंधरा गावांचे ग्रामदैवत उत्तरेश्वर देवाची यात्रा सध्या सुरू आहे. या यात्रेसाठी मुख्यमंत्री दोन दिवस आपल्या मूळ गावी आले आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर यात्रेसाठी ते दुसऱ्यांदा गावी आल्यानं गावात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. या दौऱ्यात ते सातारा जिल्ह्यातील विकासकामांची माहिती घेणार आहेत.

  • मुख्यमंत्री घेणार ग्रामसभा : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ग्रामसभा देखील होणार आहे. यात्रेशिवाय मुख्यमंत्र्यांचा अन्य कोणताही कार्यक्रम होणार नाही. दरे परिसरातील ग्रामस्थांच्या व साताऱ्यातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आणि शेत शिवार भेट, असा मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम असणार आहे.
  • प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही केलं स्वागत : मुख्यमंत्र्यांचं मंगळवारी सायंकाळी हेलिकॉप्टरनं आगमन झाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी प्रशासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. सातारा जिल्हा पोलीस दलानं त्यांना मानवंदनाही दिली. यावेळी वाईचे प्रांत अधिकारी राजेंद्र जाधव, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भालचिंम उपस्थित होते.
  • मुख्यमंत्र्यांचे शेतीत आधुनिक प्रयोग : दरे गावात मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतीत वेगवेगळ्या पिकांची लागवड केलीय. नवनवीन प्रयोग आणि सेंद्रिय शेती केली आहे. त्यांची पाहणी ते करणार आहेत. स्ट्रॉबेरी, सुपारी, लवंग, वेलची, दालचिनी, कॉफी, पेरु, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, मिरची, हळद इत्यादी पिकांची मुख्यमंत्र्यांनी आपल्या शेतात लागवड केलीय.
  • मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा गावी :एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्यांदा आपल्या गावी गेले आहेत. यापुर्वीही त्यांनी आपल्या गावाचा दौरा केलाय. त्यावेळी ते शेतातील मशागतीत रमल्याचं दिसून आलं होतं. त्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली होती.

हेही वाचा :

  1. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार गैरहजर; 'हे' आहे खरं कारण
  2. हिंमत असेल तर उद्धव ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं, शिंदे गटाचं आव्हान
Last Updated : Jan 24, 2024, 11:47 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details