महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डोंबिवली स्फोट दुर्घटनेची सरकारकडून गंभीर दखल; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश - Dombivli MIDC Blast incident - DOMBIVLI MIDC BLAST INCIDENT

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

cm eknath shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 5:41 PM IST

Updated : May 23, 2024, 6:43 PM IST

प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

ठाणे Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी विभागातील अंबर केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्यानं मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या दुर्घटनेत जखमी झालेल्या लोकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल तसेच वैद्यकीय पथक दाखल झालं असून, बचावकार्य वेगानं सुरू आहे. सध्या बचावकार्याला प्राथमिकता देण्यात आली असून, त्यानंतर या दुर्घटनेला जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सहा जणांचा मृत्यू : डोंबिवली एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. तर 48 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी दिला घटनेचा तपशील :डोंबिवलीत्या एमआयडीसी फेज दोनमध्ये अंबर केमिकल कंपनीत दुपारी मोठा स्फोट झाला. या कंपनीतील बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे एक ते दोन किलोमीटर परिसरात जाणवले. यामुळं इमारतींच्या काचाही फुटल्या. तसंच काही गाड्यांचं नुकसान झालं. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर पसरल्यानं बचावकार्यात अडथळे येत होते. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. एक्स पोस्ट करत देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली.

सर्वतोपरी मदत करणार - फडणवीस :डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून, आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्यांशी माझी चर्चा झाली. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल घटनास्थळी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सरकारकडून मोफत उपचार :आगीच्या घटनेनंतर घटनास्थळी उद्योग मंत्री उदय सामंत तसेच श्रीकांत शिंदे यांनी भेट दिली. तसेच घटना अतिशय दुर्दैवी असून, मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना सरकारकडून मदत जाहीर करण्यात येईल, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. तसेच जे जखमे आहेत, त्यांनाही सरकारकडून मोफत उपचार करण्यात येईल, असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं.

हेही वाचा -

डोंबिवली एमआयडीसीतील केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट; चार ठार, मृतांचा आकडा वाढण्याची भीती - Dombivli MIDC Blast

महाराष्ट्रातील आणखी एक प्रकल्प परराज्यात, अंबादास दानवेंकडून सरकारवर आरोप - Ambadas Danve

Last Updated : May 23, 2024, 6:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details