महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्धव ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका - CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलयं. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं ते म्हणाले.

CM Eknath Shinde
एकनाथ शिंदे (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 6, 2024, 10:35 AM IST

पुणे CM Eknath Shinde: दोन दिवसांपूर्वी पुण्यात शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "ही महाराष्ट्राची संस्कृती नसून अशा पद्धतीनं खालच्या पातळीवर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. तसेच त्यांच्या पायाखालची जमीन ही सरकली आहे."

एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंवर टीका करताना (ETV Bharat Reporter)

फसवणूक ही एकदाच होते- मुख्यमंत्री :मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंना त्यांचा पराभव दिसून आला असून राज्यातील जनता ही विकासाला साथ देत असते. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं लोकांची जशी फसवणूक केली तशी विधानसभेत देखील लोकांची फसवणूक करण्याच्या तयारीत ते आहेत; पण फसवणूक एकदाच होत असते आणि आता येणाऱ्या विधानसभेत महायुतीचं सरकार राज्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला."


महायुती सरकारचं काम 24 तास :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (5 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी येथील पूरस्थितीचा आढावा घेत पाहणी केली. यानंतर सर्किट हाऊस येथे अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुण्यात जी पूरस्थिती निर्माण झाली आहे त्याला नदी सुधार प्रकल्प जबाबदार आहे. आमचं सरकार आल्यावर नदी सुधार प्रकल्पाला स्थगिती देऊ असं शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं असता ते म्हणाले की, "महायुतीचे सरकार 24 तास काम करत आहे. जे विकास प्रकल्प महाविकास आघाडीने बंद केले होते ते आम्ही सुरू केले आहे. विकास आणि कल्याण याची सांगळ घालण्याचं काम हे सरकार करत आहे."

इतक्या बहिणींचे अर्ज वैध :लाडकी बहीण योजनेबाबत जी याचिका कोर्टात टाकली होती ती फेटाळण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "योजनेमध्ये खोडा घालणारे कपटी सावत्र भाऊ जे कोर्टात गेले होते कोर्टाने देखील त्यांची याचिका ही फेटाळली आहे. एक कोटी 5 लाख 9 हजार 542 अशा आमच्या लाडक्या बहिणींचे अर्ज वैध झाले आहेत. आणखी ही संख्या वाढणार आहे. रक्षाबंधनला या एक कोटी बहिणीच्या खात्यात पैसे जाणार आहे. ही एक पोटदुखी असून कोर्टानं देखील त्यांच्या विरोधात निर्णय दिला आहे. हे लोकं घरात बसून आरोप करतात आणि आम्ही पूरस्थितीची पाहणी करत आहोत. जनता ही सुज्ञ असून काम करणाऱ्या लोकांनाच जनता निवडून देते आणि घरी असणाऱ्यांना कायमचा घरी बसवते."

हेही वाचा:

  1. 'आप'ने 'इंडिया' आघाडीची साथ सोडली? महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार - Maharashtra Politics
  2. शेतकऱ्यांना मदत करायचं दूर, पण महायुतीकडून निवडणूक जाहिरातींवर 70 कोटींचा खर्च - रमेश चेन्निथला - Ramesh Chennithala News
  3. अदानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शरद पवारांचे कानावर हात, शिंदे-पवार भेटीवरुन तापलं राजकारण - Sharad Pawar Meets Eknath Shinde

ABOUT THE AUTHOR

...view details